eknath shinde devendra fadnavis ajit pawar uddhav thackeray sharad pawar nana patole sarkarnama
महाराष्ट्र

Exit Polls 2024 : शिंदे, फडणवीस अन् अजितदादांना धक्का; ठाकरे, पवार, पटोले ठरणार 'किंग'

Maharashtra Lok Sabha Exit Poll Results Live : 2019 च्या निवडणुकीत भाजप प्रणित युतीला 42 जागा मिळाल्या होत्या. पण, 2024 मध्ये त्यांना 16 ते 20 जागांचा फटका बसण्याची शक्यता आहे.

Akshay Sabale

Exit Polls Result 2024, 1 June : शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षात फूट पडल्यानंतर पहिल्यांदाच राज्यात मोठी निवडणूक पार पडली. अटीतटीची झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजप, शिवसेना ठाकरे गट, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी शरद पवार आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांची प्रतिष्ठा पणाली लागली होती.

या निवडणुकीत महायुतीला धक्का बसल्याचं दिसून येत आहे. तर, महाविकास आघाडीनं चांगली आघाडी घेतली आहे. राज्यात महाविकास आघाडीला 22 ते 25 जागा तर महायुतीला 22 ते 26 जागा मिळण्याचा अंदाला 'एबीपी सी व्होटर'नं व्यक्त केला आहे.

'टीव्ही 9 पोलस्ट्राट'च्या एक्झिट पोलनुसार महायुती पिछाडीवर दिसत आहे. टीव्ही 9 पोलस्ट्राट'च्या पोलनुसार महाविकास आघाडीला 25 तर महायुतीला 22 जागा मिळत आहेत. तर, अपक्षला 1 जागा दाखवत आहे.

'एपीबी सी व्होटर' -

महायुती -

भाजप - 17

शिंदे गट - 6

राष्ट्रवादी काँग्रेस ( अजितदादा पवार ) - 1

महाविकास आघाडी

शिवसेना ( ठाकरे गट ) - 9

काँग्रेस - 8

राष्ट्रवादी ( शरद पवार गट ) - 6

अपक्ष - 1

कोणी किती जागा लढल्या?

भाजप - 28

शिंदे गट - 15

अजितदादा पवार - 4

महादेव जानकर - 1

उद्धव ठाकरे - 21

काँग्रेस -17

शरद पवार - 10

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT