Madha lok sabha Lok Sabha Exit Poll 2024 : माढ्यात भाजपला धक्का! शरद पवारांची 'तुतारी' वाजणार

Dhairyasheel mohite patil Will be Win Lok Sabha Exit Poll 2024 : टीव्ही 9 पाॅलस्ट्राट एक्झिट पोलनुसार धैर्यशील मोहिते पाटील विजय होत असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
Ranjeetsinha Naik-Nimbalkar, Dhairyasheel Mohite Patil
Ranjeetsinha Naik-Nimbalkar, Dhairyasheel Mohite PatilSarkarnama

Exit Poll 2024 : लोकसभा निवडणुकीत हायव्होल्टेज लढत माढा लोकसभा मतदारसंघात झाली. भाजपचे रणजितसिंह निंबाळकर यांच्या विरोधात धैर्यशील मोहिते पाटील यांनी दंड थोपटले होते. या दोघांच्या लढतीत कोण विजय होणार, याचा अंदाज एक्सिट पोलमध्ये वर्तवला आहे.

टीव्ही 9 पाॅलस्ट्राट एक्झिट पोलनुसार धैर्यशील मोहिते पाटील विजय होत असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. जर हा अंदाज चार जूनला खरा ठरला तर भाजपला मोहित पाटील यांना डावल्याची मोठी किंमत मोजावी लागली, असेच म्हणावे लागेल.

टीव्ही 9 पाॅलस्ट्राट एक्झिट पोलनुसार महाराष्ट्रातमध्ये महायुतीला 22 जागा आणि महाविकास आघाडीला 25 जागा मिळणार असल्याचे वर्तवण्यात येत आहे. या एक्झिट पोलच्या अंदाजानुसार महाराष्ट्रात धक्कादायक निकाल लागणार आहे. बीडच्या जागेवर पंकजा मुंडे तर परभणीच्या जागेवर ठाकरे गटाचे संजय जाधव विजयी होत आहेत. तर सांगलीच्या जागेवर काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विशाल पाटील विजयी होण्याचा अंदाज एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आला आहे.

अजित पवार गटाला या एक्झिट पोलनुसार अवघी एक जागा मिळण्याचा अंदाज आहे. त्यातही पोलनुसार बारामतीच्या जागेवर सुप्रिया सुळे आघाडीवर असल्याचा अंदाज असल्याने ती एक जागा कोणती याची उस्तुकता असणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com