prakash ambedkar sarkarnama
महाराष्ट्र

Vanchit Bahujan Aghadi : 'वंचित'च्या 38 पैकी 36 उमेदवारांचे डिपाॅझिट जप्त, मतांची टक्केवारी घसरली

Roshan More

Lok Sabha Election Result : वंचित बहुजन आघाडी 2019 मध्ये तब्बल 7 टक्के मते घेतली होती. 'वंचित'मुळे काँग्रेसला मोठा फटका बसला होता. मात्र, यंदा वंचितच्या 38 पैकी 36 उमेदवारांचे डिपाॅझिट जप्त झाले आहे. तसेच वंचितच्या मतांची टक्केवारी 6.98 वरून 3.67 टक्क्यांवर घसरली आहे. प्रकाश आंबेडकर आणि हिंगोलीचे उमेदवार वगळता सर्वच उमेदवारांचे डिपाॅझिट जप्त झाले आहे.

वंचितच्या फक्त दोनच उमेदवारांना लाखाचा आकडा पार करता आला. त्यामध्ये प्रकाश आंबेडकर यांनी अकोला मतदारसंघातून दोन लाख 76 हजार 747 मते मिळाली तर, हिंगोलीमध्ये वंचितचे उमेदवाराला एक लाख 61 हजार 814 मते मिळाली.

तिसऱ्या, चौथ्या स्थानावर

वंचित महाविकास आघाडी आणि महायुतीच्या लढाईत बहुतांश मतदारसंघामध्ये वंचितचे उमेदवार तिसर्‍या अथवा चौथ्या क्रमांकावर राहिले. अकोला लोकसभा मतदारसंघामध्ये देखील प्रकाश आंबेडकर Prakash ambedkar तिसऱ्या स्थानावर होते. वंचितचे 21 उमेदवार तिसऱ्या स्थानी असून 15 उमेदवार चौथ्या क्रमांकावर आहेत.

फटका कोणाला?

2019 च्या लोकसभा निवडणुकीत वंचितचा सर्वात मोठा फटका काँग्रेसला बसला होत. काँग्रेसच्या चार ते पाच जागा वंचितमुळे पडल्याचे सांगितले जात होते. यंदा काँग्रेसला चांगले यश मिळाले आहे. त्यामुळे वंचितच्या मतांची टक्केवारी घटली असली तरी त्यांच्या उमेदवारांनी तिसऱ्या क्रमांकाची मते घेत महायुतीचे नुकसान केल्याची चर्चा आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT