MVA Meeting  Sarkarnama
महाराष्ट्र

Loksbha Election 2024 : राऊतांकडे आघाडीचा ‘कंट्रोल’ ? नानांची हाताची घडी तोंडावर बोट.. तर आंबेडकर हातचं राखून

Sachin Waghmare

Mumbai News : शिवसेना संजय राऊत यांच्यामुळे फुटली, महाविकास आघाडीत बिघाडी त्यांच्यामुळेच झाली, अशा विविध आरोपांनी सर्वच जण त्यांच्या नावाने खडे फोडत असतात. मात्र, या सर्व विरोधकांकडून होत असलेल्या आरोपांना पूर्णविराम देत महाविकास आघाडीवर Maha Vikas Aghadi अजूनही शिवसेना ठाकरे गटाची कमांड असल्याचे संजय राऊत यांनी दाखवून दिले आहे.

महाविकास आघाडीच्या लोकसभेच्या जागावाटपाबाबत झालेल्या बैठकीत प्रमुखाच्या खुर्चीवर बसून संजय राऊतांनी आघाडीवर ठाकरेंचाच Uddhav Thackeray कंट्रोल असल्याचे सिद्ध केले आहे. Mahavikas Aghadi Meeting What is role of Sanjay Raut Prakash Ambedkar

शुक्रवारी झालेल्या या बैठकीतील संजय राऊत Sanjay Raut यांचा रुबाबाच सर्व काही सांगून जात होता. दुसरीकडे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले मात्र मध्यभागातील खुर्चीवर हाताची घडी घालून बसले होते तर महाविकास आघाडीत उशीरा सहभागी झालेले वंचित आघाडीचे प्रकाश आंबेडकर कोपऱ्यातील खुर्चीवर लांबच बसून होते. विरोधकांकडून कितीही टीका केली जात असली तरी महविकास आघाडीवर तूर्तास तरी शिवसेना ठाकरे गटाचे कंट्रोल असून तेच आघाडीचे नेतृत्व करणार हे समोर आले आहे.

महाविकास आघाडीची लोकसभेच्या जागावाटपाची बैठक शुक्रवारी पंचताराकिंत हॉटेलात होत आहे. या बैठकीस आघाडीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेना ठाकरे गटाकडून संजय राऊत (Sanjay Raut) , राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून जयंत पाटील तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan), माजी मंत्री बाळासाहेब थोरात, वर्षा गायकवाड, वंचित आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांच्यासह नेतेमंडळी बैठकीस उपस्थित होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

या बैठकीत लोकसभेच्या जागावाटपाबाबत चर्चा सुरु असून आघाडीतील घटक पक्षात ४० जागांवर एकमत झाले असल्याचे समजते. उर्वरित आठ जागांबाबत या बैठकीत चर्चा सुरु आहे. या बैठकीत चर्चा पूर्ण झाल्यानंतर तीन पक्षातील प्रमुखांना माहिती दिली जाणार आहे. त्यानंतर या जागावाटपावर शिक्कामोर्तब केले जाणार आहे.

दरम्यान, या बैठकीत वंचित आघाडीचे प्रकाश आंबेडकर (Prakash ambedkar) सहभागी झाल्याने त्यांचे आघाडीतील सर्वच घटका पक्षाकडून स्वागत करण्यात आले.

SCROLL FOR NEXT