Sharad Pawar
Sharad Pawar Sarkarnama

Sharad Pawar Called Meeting MVA : शरद पवारांनी पुन्हा टायमिंग साधलं; महाविकास आघाडीची बोलावली बैठक

India Aaghadi News : आपण मोदींसोबत एका पुरस्कारच्या कार्यक्रमासाठी गेलो होतो. मात्र, राजकीयदृष्ट्या त्यांना आपला विरोध राहील, हे दाखवून देण्यासाठी त्यांनी तातडीने महाविकास आघाडीची बैठक बोलावली असू शकते

मुंबई : एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत व्यासपीठावर जाऊन चर्चेच्या केंद्रस्थानी आलेले ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी येत्या पाच ऑगस्ट रोजी महाविकास आघाडीची बैठक बोलावली आहे. त्यामुळे पाच तारखेच्या बैठकीला कोणकोणते नेते उपस्थित राहतात, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष असणार आहे. (Sharad Pawar called a meeting of Mahavikas Aghadi on August 5)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शरद पवार (Sharad Pawar) यांच्या उपस्थितीत आज लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. त्या कार्यक्रमाला पवार यांनी जाऊन नये. मोदींसोबत एकाच व्यासपीठावर एकत्र येऊ नये, त्यातून चुकीचा संदेश जाईल, अशी विनंती इंडिया आघाडीतील सर्वच नेते पवारांना करत होते. मात्र, मोठ्या विरोधानंतरही पवारांनी मोदींसोबत कार्यक्रमाला हजेरी लावली. त्याची चर्चा संपूर्ण देशात सुरू आहे.

Sharad Pawar
Modi Pune Visit : टिळक-सावरकर नात्यावर मोदींचे भाष्य; ‘टिळकांनी सावरकरांची ब्रिटनमधील शिष्यवृत्तीसाठी शिफारस केली होती'

मोदींसोबतच्या हजेरीची चर्चा राज्यात सुरू असताना इकडे पवारांनी पुन्हा एकदा गुगली टाकली आहे. आपण मोदींसोबत एका पुरस्कारच्या कार्यक्रमासाठी गेलो होतो. मात्र, राजकीयदृष्ट्या त्यांना आपला विरोध राहील, हे दाखवून देण्यासाठी त्यांनी तातडीने महाविकास आघाडीची (Mahavikas Aghadi) बैठक बोलावली असू शकते, अशीही चर्चा आता रंगली आहे. ती बैठक पाच ऑगस्ट रोजी मुंबईत होणार आहे.

Sharad Pawar
Eknath Shinde Speech : मोदींनी नऊ वर्षांत केलेल्या कामाची पोचपावती म्हणजे टिळक पुरस्कार; मुख्यमंत्र्यांकडून पंतप्रधानांचे कौतुक

दरम्यान, इंडिया या राष्ट्रीय पातळीवरील विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या आघाडीची पुढची बैठक मुंबईत होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर ही बैठक असू शकते. राष्ट्रीय पातळीवर होणाऱ्या आघाडीच्या बैठकीची तयारी कशी करायची, काय नियोजन असणार याबाबतची चर्चा या बैठकीत होण्याची शक्यता आहे.

Sharad Pawar
Sharad Pawar Greets PM Modi : व्यासपीठावर पोचताच शरद पवार अन॒ नरेंद्र मोदी रमले हास्यविनोदात...

मुंबईत पाच ऑगस्ट रोजी बोलावलेल्या महाविकास आघाडीच्या बैठकीला शरद पवार यांच्यासोबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे नेते उपस्थित राहणार आहेत, असे सांगितले जात आहे. मात्र, सामना या शिवसेनेच्या मुखपत्रातून आजच शरद पवार यांच्यावर टीका करण्यात आली आहे. मोदींसोबत पवारांनी एका व्यासपीठावर जाणे शिवसेनेला आवडलेले नाही, तशी नाराजी त्यांनी सामनाच्या अग्रेलखातून दाखवून दिलेली आहे. त्यामुळे पवारांनी जरी पाच ऑगस्टला बैठक बोलावली असली तरी त्या बैठकीला कोण कोणते नेते उपस्थित राहणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष असणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com