Uddhav Thackeray and Chandrashekhar Bawankule  Sarkarnama
महाराष्ट्र

Chandrashekhar Bawankule : महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, 'खरं उत्तर...'

Uddhav Thackeray Chandrashekhar Bawankule MVA : चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, उद्धव ठाकरे पहिले आम्हाला चिडवायचे की तुम्हाला दिल्ली दरबारी जाऊन निर्णय करावे लागतात. आज त्यांच्यावरही परिस्थिती आली. तीन दिवस दिल्लीत जावे लागले.

Roshan More

Chandrashekhar Bawankule News : उद्धव ठाकरे यांनी दिल्ली दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे, राहुल गांधी यांची भेट घेतली. ठाकरेंच्या या भेटीनंतर महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा उद्धव ठाकरे हे असतील, अशी चर्चा सुरू झाली. यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

बावनकुळे यांनी महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री ठाकरे असतील ही शक्यता फेटाळून लावली. ते म्हणाले, 'अशा बातम्या मुद्याम पेरल्या जातात. त्यांनी असा कुठलाही निर्णय केला नाही. याची खात्री करायची असेल तर काँग्रेसचे अध्यक्ष आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष यांना विचारले तर खरं उत्तर ते देऊ शकतील.'

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, उद्धव ठाकरे पहिले आम्हाला चिडवायचे की तुम्हाला दिल्ली दरबारी जाऊन निर्णय करावे लागतात. आज त्यांच्यावरही परिस्थिती आली. तीन दिवस दिल्लीत जावे लागले. अपॉइंटमेंट घेऊन मुख्यमंत्रिपदासाठी याचना करावी लागते. तरी इतर दोन मित्र हे सांगायला तयार नाही की तेच मुख्यमंत्री असतील. मला त्यांच्याबद्दल सहानुभूती वाटते.

ठाकरेंना वणवण भटकावे लागते

'आमच्या सोबत असताना खिशात राजीनामा घेऊन धमकी द्यायचे. मात्र ही धमकी आता दिली तर त्यांच्या खिशातले राजीनामे ते बाहेर काढतील का? हे सांगता येत नाही. आज त्यांना वणवण भटकावे लागते. बाळासाहेब ठाकरे यांच्या वैचारिक अध्यायाचा हा चिंताजनक दिल्लीचा प्रवास आहे, असा टोला बावनकुळे यांनी ठाकरेंना लगावला.

राज्यसभेची एक जागा अजित पवार गटाला?

महाराष्ट्रात राज्यसभेच्या दोन जागा रिक्त आहेत. पियुष गोयल आणि उदयराजे भोसले हे लोकसभेत विजयी झाल्याने या जागा रिक्त झाल्या आहेत. या दोन्ही जागा भाजपच्या आहेत. मात्र, उदयनराजेंसाठी साताऱ्याची जागा सोडताना त्यांची राज्यसभेची जागा आपल्याला मिळणार असल्याचे अजित पवार यांनी जाहीर केले होते. राज्यसभेच्या जागेविषयी बोलताना चंद्रशेखर बावनुकुळे म्हणाले, चर्चा होऊन त्यावर निर्णय होईल. त्यामुळे ही जागा अजित पवार गटाला मिळणार का हे अजुनही गुलदस्त्यात आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT