Nitesh Rane : नितेश राणे यांच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट, संजय राऊत यांच्या अब्रुनुकसानीच्या दाव्यावर कोर्टाचा मोठा निर्णय

Nitesh Rane Sanjay Raut : खटल्यात वारंवार गैरहजर राहणाऱ्या नितेश राणे यांना दिलासा देण्यास प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी आरती कुलकर्णी यांनी स्पष्ट नकार दिला आणि थेट अजामीनपात्र वॉरंट बजावले.
Nitesh Rane, Sanjay Raut
Nitesh Rane, Sanjay Raut Sarkarnama
Published on
Updated on

Nitesh Rane News : भाजप आमदार नितेश राणे यांना मोठा झटका बसला आहे. ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी माझगाव कोर्टात अॅड. मनोज पिंगळे यांच्यामार्फत नितेश राणेंविरोधात अब्रुनुकसानीचा खटला दाखल केला होता. या दाव्याप्रकरणी कोर्टाने नितेश राणे यांना यांच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट बजावले आहे.

या प्रकरणाची सुनावणी मंगळवारी पार पडली. या सुनावनीला नितेश राणे गैरहजर होते. न्यायालयाने याची गंभीर दखल घेतली आहे. त्यामुळे राणे यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे.

अटक टाळण्यासाठी नितेश राणेंना १७ ऑक्टोबरला न्यायालयात हजर राहावेच लागणार आहे .मंगळवारी झालेल्या सुनावणी दरम्यान राणे यांच्या वकिलांनी उपस्थित राहण्यापासून सूट विनंती केली होती. मात्र, खटल्यात वारंवार गैरहजर राहणाऱ्या नितेश राणे यांना दिलासा देण्यास प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी आरती कुलकर्णी यांनी स्पष्ट नकार दिला आणि थेट अजामीनपात्र वॉरंट बजावले.

Nitesh Rane, Sanjay Raut
Vidhan Sabha Election : शिवसेना-भाजपची पहिल्यांदाच युती, काँग्रेस पुन्हा सत्तेत!

न्यायालयाने व्यक्त केली नाराजी

नितेश राणेंविरुद्ध यापूर्वीही कोर्टाने अजामीनपात्र वॉरंट बजावले होते. तसेच राणे हे खटल्यातील तारखांना वारंवार गैरहजर राहत होते. त्यामुळे मंगळवारी झालेल्या सुनावणीत न्यायालयाने त्यांच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट बजावतनितेश राणे खटल्यात गांभीर्याने वागत नसल्याची नाराजी न्यायालयाने बोलून दाखवले.

Nitesh Rane, Sanjay Raut
Aditi Tatkare Convoy Accident : मोठी बातमी! महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांच्या ताफ्यातील गाडीचा अपघात

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com