Mahadev Jankar News Sarkarnama
महाराष्ट्र

Mahadev Jankar News : 'तुने मुझे एक धोखा दिया है, मै तुम्हे सौ धोखे दूंगा…'; जानकरांचा 'या' भाजप उमेदवाराला इशारा

Mahadev Jankar Big Statement : काही लोक गद्दार झाले, पैसे घेऊन त्यांच्याकडे गेले. त्यावेळेस माझ्या डोळ्यातून पाणी आलं.त्याचा बदला घ्यायचा असेल तर सीटींग आमदाराचे डिपॉझिट जप्त करा असं आवाहनही महादेव जानकर यांनी केलं.

Deepak Kulkarni

Daund News : लोकसभा निवडणुकीत परभणी मतदारसंघातून पराभूत झाल्यानंतर राष्ट्रीय समाज पक्षाचे सर्वेसर्वा महादेव जानकर यांनी महायुतीला रामराम ठोकला आहे. जानकर यांनी विधानसभा निवडणुकीसाठी आता स्वबळाची घोषणा केली आहे. महाराष्ट्रातील सर्व मतदारसंघांमध्ये रासपचे उमेदवार उतरवणार आहेत. तसेच ते प्रत्येक मतदारसंघात सभा घेणार आहेत. यामुळे महायुतीसह महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढली आहे.

राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर (Mahadev Jankar) यांनी राज्यातील महायुती आणि महाविकास आघाडी दोन्हीविरोधात दंड थोपटले असून त्यांनी परिवर्तन महाशक्तीचा तिसरा पर्यायही नाकारला आहे. त्यांनी थेट विधानसभेला 288 जागा लढविण्याचा निर्णय घेतलेला आहे.यातच त्यांनी आता महायुतीतील भाजपच्या विद्यमान आमदार आणि नुकतीच उमेदवारी जाहीर झालेल्या उमेदवारालाच कडक इशारा दिला आहे.

दौंड येथे महादेव जानकर यांनी राष्ट्रीय समाज पक्षाचा सोमवारी (ता.21 जाहीर मेळावा घेतला.या मेळाव्यात त्यांनी तुफान फटकेबाजी केली. ते म्हणाले,तुने मुझे एक धोका दिया है, मै तूम्हे सौ धोके दूंगा, उसका नाम महादेव जानकर है असा इशारा थेट भाजपने दौंडमधून उमेदवारी जाहीर केलेल्या राहुल कूल (Rahul Kul) यांना दिला आहे.

जानकर म्हणाले,धमकीला घाबरू नका.महादेव जानकर हिंदकेसरी आहे. एक दगड आला, तर दहा दगड जातील. माझ्या कार्यकर्त्याच्या केसाला धक्का लागला तर तुमचे खानदान ठेवणार नाही, असंही जानकर यांनी म्हटलं आहे.

...तर सीटींग आमदाराचे डिपॉझिट जप्त करा!

बारामतीमध्ये ज्या वेळेस मी 2014 ला खासदारकीला उभा होतो,त्यावेळेस ते महाभाग (राहुल कुल) माझ्यासोबत नव्हते. नंतर विधानसभेला माझ्याकडे आले, पाया पडले आणि मला तिकीट द्या म्हणाले. त्यावेळी ‘त्यांना बायको नव्हती आणि आम्हाला पण नवरा नव्हता.’ आम्ही त्यांना तिकीट दिले. नंतर त्यांनी आम्हाला धोका दिला.

तुने मुझे एक धोका दिया है,मै तूम्हे सौ धोके दूंगा, उसका नाम महादेव जानकर है, असे यावेळी जानकर म्हणाले. काही लोक गद्दार झाले, पैसे घेऊन त्यांच्याकडे गेले. त्यावेळेस माझ्या डोळ्यातून पाणी आलं.त्याचा बदला घ्यायचा असेल तर सीटींग आमदाराचे डिपॉझिट जप्त करा असं आवाहनही महादेव जानकर यांनी केलं.

'मी देणारा आहे घेणारा नाही...'

महादेव जानकरांनी यावेळी महायुतीवरही हल्लाबोल केला. ते म्हणाले,आम्हाला महायुतीतील पक्षांनी विश्वासात घेतलं नाही,आम्हाला कसल्याही जागांची चर्चा किंवा बैठकीला बोलवलं नाही, त्यामुळे आम्ही महायुतीतुन बाहेर पडलो.पण मी देणारा आहे घेणारा नाही.मला विधानसभा परिषद देत होते, मी घेतली नाही.आता महाविकास आघाडी आणि महायुतीतसुध्दा जाणार नाही.आमचं जे काय होईल, यासाठी आम्ही खंबीर असल्याचंही जानकर यांनी यावेळी सांगितलं.

दौंडमध्ये राष्ट्रीय समाज पक्ष सक्षम उमेदवार देणार...

दौंडमधील जनतेने माझ्यावर विश्वास ठेवत 2014 साली रासपच्या आमदाराला निवडून देत उपकार केले आहेत,परंतू आज दौंडचा उमेदवार जाहीर करणार नाही.दौंडसाठी सक्षम उमेदवार आल्यानंतर नाव निश्चित केले जाईल. येथे रासप सक्षम उमेदवार देणार आहे.आता उमेदवार जाहीर केला,तर उमेदवार पळवून नेतील, असा खोचक टोलाही जानकर यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT