MLA Balaji Kalyankar News : स्वतःसाठी पक्ष बदलला, समाजासाठी काय केले ? सत्तर वर्षाच्या आजोबांनी आमदाराला घाम फोडला

What did you do for the Maratha community? The old man should ask MLA Balaji Kalyankar : निळा गावातील हा व्हिडिओ सध्या प्रसार माध्यमासह सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. बालाजी कल्याणकर हे नांदेड उत्तरचे विद्यमान आमदार आहेत. या निवडणुकीत पुन्हा त्यांनाच उमेदवारी दिला जाणार असल्याचे बोलले जाते.
MLA Balaji Kalyankar News
MLA Balaji Kalyankar NewsSarkarnama
Published on
Updated on

Maratha Reservation News : लोकसभा निवडणुकीत मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून समाजामध्ये असलेला रोष अजूनही कायम आहे. ओबीसीमधून मराठा समाजाला आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी चौदा महिने आंदोलन केले. लोकसभा निवडणुकीत याचा फटका सत्ताधारी महायुतीला मराठवाड्यासह राज्यात बसला. विधानसभेला चित्र बदलले असा दावा महायुतीकडून केला जातोय. पण जसजशी विधानसभा निवडणूक जवळ येत आहे, तसा सत्ताधारी महायुतीच्या आमदारांना पुन्हा मराठा समाजाच्या रोषाला तोंड द्यावे लागत आहे.

नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार बालाजी कल्याणकर यांना मतदारसंघातील निळा गावात एका सत्तर वर्षाच्या आजोबांनी जाब विचारला. स्वतःसाठी पक्ष बदलता, पण मराठा समाजासाठी काय केले ? मराठा आरक्षणाची (Maratha Reservation) मागणी कधी केली का ? अशा प्रश्नांची सरबत्ती करत आता मनोज जरांगे पाटील सांगतील तेच होणार, असे ठणकावून सांगितले. ऐन निवडणुकीच्या काळात गावातून झालेल्या या विरोधाने शिवसेनेचे आमदार बालाजी कल्याणकर यांचे टेन्शन वाढले आहे.

निळा गावातील हा व्हिडिओ सध्या प्रसार माध्यमासह सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. बालाजी कल्याणकर हे नांदेड उत्तरचे विद्यमान आमदार आहेत. या निवडणुकीत पुन्हा त्यांनाच उमेदवारी दिला जाणार असल्याचे बोलले जाते. या पार्श्वभूमीवर कल्याणकर हे मतदारंघात कामाला लागले आहेत. आज निळा या गावात बालाजी कल्याणकर गेले होते. गावकऱ्यांशी चर्चा करत असतांना तिथे एक वृद्ध आजोबा आले आणि त्यांनी थेट आमदार महोदयांना जाब विचारायला सुरवात केली.

MLA Balaji Kalyankar News
Maratha Protest News : भाजप प्रदेश सरचिटणीस संजय केनेकर यांच्या कार्यालयावर मराठा आंदोलकांकडून हल्ल्याचा प्रयत्न

मराठा आरक्षण आणि समाजासाठी तुम्ही काय केले ते सांगा ? आरक्षणासाठी कोणी बोललं का सांगा ? आले का कुणी समाजासाठी धावून. स्वत:साठी पक्ष बदलता, काहीही करता. (Shivsena) पण समाजासाठी यांनी काहीच केले नाही, अशा शब्दात या आजोबांनी आपला संताप व्यक्त केला. एवढ्यावच आजोबा थांबले नाही, तर आता मनोज जरांगे पाटील जे सांगितील तेच होणार, त्यांनी ज्याला पाडायला सांगितले त्याला पाडणार, ज्याला निवडून द्या सांगितले त्याला निवडून देणार.

गावात आता जरांगे पाटील यांनी सांगितले तेच होणार, माझा व्हिडिओ काढा अन् करा व्हायरल, असेही आजोबा म्हणाले. अचानक झालेल्या या प्रकाराने आमदार कल्याणकर यांच्यासह उपस्थितीत गावकरीही चक्रावून गेले. आजोबांना शांत करत कशीबशी कल्याणकर यांनी चर्चा उरकली आणि गावातून काढता पाय घेतला. या प्रकाराची चर्चा मात्र मोठ्या प्रमाणात राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

MLA Balaji Kalyankar News
Shivsena Shinde Group: कोर्टात जाऊनही '50 खोके' शिंदे गटाचा पिच्छा सोडेना; विधानसभेलाही घाम फोडणार

मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीत उमेदवार देणार असल्याचे काल अंतरवाली सराटीत झालेल्या बैठकीत स्पष्ट केले होते. त्यासाठी निवडक इच्छुकांनी अर्ज भरावेत, राखीव मतदारसंघात उमेदवार देणार नाही, जो मराठा आरक्षणाला आणि आपल्या मागण्यांना पाठिंबा देईल त्याला समर्थन देण्याची आणि लेखी हमी घेण्याची भूमिका जाहीर केली. येत्या दोन दिवसात मनोज जरांगे पाटील या संदर्भात पुढील भूमिका स्पष्ट करणार आहेत. मराठा समाजाचा महायुती विरोधातील रोष मात्र अजूनही कायम असल्याचे निळा गावातील प्रकारातून दिसून आले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com