MLA Mahadev Jankar Sarkarnama
महाराष्ट्र

Mahadev Jankar and Vidhan Sabha Election : महादेव जानकर विधानसभा निवडणूक स्वबळावर लढवणार?

Rashtriya Samaj Paksha and Assembly Elections : जाणून घ्या, किती जागा लढवण्याची तयारी करण्याच्या सूचना पक्षाने पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

Mayur Ratnaparkhe

Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभा निवडणुकीत देशात भाजप नेतृत्वातील एनडीए आघाडीचे सरकार पुन्हा एकदा स्थापन झालेले आहे. मात्र महाराष्ट्रात विरोधकांच्या महाविकास आघाडीने मुसंडी मारलेली आहे. त्यामुळे विरोधी पक्षांचा कॉन्फिडन्स वाढलेला आहे.

परिणामी आगामी विधानसभा निवडणूक चांगलीच चुरशीची लढत होणार असल्याचे दिसत आहे. या पार्श्वभूमीवर आता सर्वच राजकीय पक्ष निवडणुकीच्या तयारील लागले आहेत.

परभणी लोकसभा मतदारसंघात (Parbhani Loksabha Election ) पराभूत झाल्यानंतर आता महादेव जानकरांनी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. त्यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाने आगामी विधानसभा स्वबळावर लढवण्याच्या दृष्टीने तयारी सुरू केली आहे.

104 विधानसभा मतदारसंघात तयारी करा असे आदेश पक्षाने पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दिले असल्याची माहिती समोर आली आहे.

जर महादेव जानकरांच्या राष्ट्रीय समाज पक्षाने जर 104 जागांवर निवडणूक लढवली तर अनेक ठिकाणी महायुतीच्या उमेदवारांच्या विरोधात त्यांना निवडणूक लढवावी लागेल. अशावेळी ही लढत मैत्रीपूर्ण राहाणार की, विरोधक म्हणूनच निवडणूक होणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल..

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT