Mumbai News : लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने यावेळेस मोठी रस्सीखेच पहावयास मिळाली. या निवडणुकीत प्रचाराच्या रणधुमाळीत सत्ताधारी व विरोधकांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केल्याने राज्यभरातील वातावरण चांगलेच तापले होते. लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी संपली असली तरी निकालाची उत्सुकता सर्वानाच आहे. दुसरीकडे लोकसभा निवडणुकीत मनसेने थेट सहभाग घेतला नाही.
मनसेचे (MNS) नेते राज ठाकरे यांनी लोकसभा प्रचारात सहभाग घेत काही ठिकाणी सभा घेतल्या आहेत. त्यामुळे लोकसभा निवडणुकीतील कामगिरीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. गुढी पाडव्याच्या मेळाव्यातून मनसे प्रमुख राज ठाकरेंनी (Raj Thackeray) विधानसभेच्या तयारीला लागा, असे आदेशच मनसैनिकांना दिले. त्यामुळे येत्या काळात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे (Amit Thackeray) निवडणूक रिंगणात उतरणार असल्याची चर्चा सुरू आहे. (Amit Thackeray News)
मनसेचे नेते अमित ठाकरे यांच्या वाढदिवसादिनी ज्या पद्धतीने शक्तिप्रदर्शन करण्यात आले, त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने मनसेच्या कार्यकर्त्यांचा जो उत्साह दिसून आला. त्यामुळे आगामी काळात होत असलेल्या विधानसभा निवडणूक अमित ठाकरे हे लढणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
मुंबईत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत महायुतीची सांगता सभा झाली. या सभेदरम्यान अमित ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली होती. त्यामुळे, अमित ठाकरे आता संसदीय राजकारणात सक्रीय होत असल्याची चर्चा सुरू आहे. त्यातच, वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांच्या कार्यकर्त्यांकडूनही काही सूचक संकेत देण्यात आले आहेत. त्यामुळे अमित ठाकरे विधानसभा निवडणूक लढणार असल्याची चर्चा जोरात रंगली आहे.
राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
मनसेचे नेते अमित ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मुंबईतील शिवाजी पार्क, वरळीसह अनेक भागात अमित ठाकरेंचे होर्डींग्ज लावल्याचे दिसून आले. तर, मनसैनिकांनीही त्यांच्या विधानसभा निवडणूक लढवण्याचे संकेत दिले. चेंबुरमध्ये मंत्रालय व लाल दिव्याच्या गाडीचा केक कापून त्यांचा वाढदिवस साजरा केला. अमित ठाकरे लोकसभा निवडणुकीत चांगलेच सक्रीय झाल्याचे दिसून आले. लोकसभा निवडणुकीत मनसेनं भाजपला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला.
मनसैनिकांनी मध्यरात्रीच अमित ठाकरे यांच्या वाढदिनी मोठ्या जल्लोषात त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. मनसेचे चेंबूर विभागाचे विभाग अध्यक्ष माऊली थोरवे यांनी अमित ठाकरेंसाठी आणलेला केक चर्चेचा विषय ठरला. विधान भवन, मंत्रालय आणि लाल बत्तीची गाडी असलेला हा केक अमित ठाकरेंनी येत्या काळात लवकर मंत्रालयात जावे, या शुभेच्छा देणारा होता, त्यामुळे जोरात चर्चा रंगली आहे.