Shreeganesh Karad sushil  Karad son of Valmik Karad, questioned by police in Mahadev Munde murder case. sarkarnama
महाराष्ट्र

Mahadev Munde Murder Case : महादेव मुंडे प्रकरणात वाल्मिक कराडची दोन्ही मुलं अडचणीत? पोलिसांनी तब्बल 17 तास...

Walmik Karad son Shreeganesh Sushil Police SIT : महादेव मुंडे हत्या प्रकरणात चौकशी करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी यांच्या मागणीनुसार एसआयटीची स्थापना केली आहे. त्यानंतर पाच जणांची चौकशी करण्यात आली.

Roshan More

Mahadev Munde Murder : परळीतीली व्यापारी महादेव मुंडे हत्या प्रकरणात मोठी अपडेट समोर येत आहे. मुंडे यांच्या हत्या प्रकरणात वाल्मिक कराड हा मुख्यसुत्रधार असल्याचा आरोप बाळा बांगर याने केला होता. तसेच त्याची दोन मुलं देखील या हत्येत सहभागी असल्याचे आमदार सुरेश धस यांनी म्हटले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंडेंच्या हत्या प्रकरणात एसआयटीची स्थापना केल्याच्या अवघ्या काही तासांतच परळीतून पाच जणांना ताब्यात घेण्यात आले होते.

ज्या पाच जणांना ताब्यात घेत चौकशी करण्यात आली होती. त्यामध्ये वाल्मिक कराडची दोन्ही मुंल श्रीगणेश आणि सुशील या दोघांचा समावेश होता. पोलिसांनी या दोघांची तब्बल 17 तास कसून चौकशी केल्याची माहिती आहे. महादेव मुंडे हत्या प्रकरणात फरार आरोपी गोट्या गित्ते याच्यासह या दोघांचा सहभाग असल्याचा आरोप करण्यात येत आहे.

महादेव मुंडे यांच्या नावावर असलेला प्लाॅट आपल्या नावावर करण्यासाठी त्यांची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी पोलिस तपास करत असताना धनंजय मुंडे यांच्या बंगल्यावरून पोलिसांनी तपास थांबवावा म्हणून फोन करण्यात आला होता. हा फोन वाल्मिक कराड याने केला होता, असा दावा बाळा बांगर याने केला होता. त्यामुळे महादेव मुंडे हत्या प्रकरणात वाल्मिक कराड हा मुख्यसुत्रधार असल्याचा संशय देखील व्यक्त करण्यात येत होता.

एसआयटीच्या प्रमुखपदी पंकज कुमावत

महादेव मुंडे हत्या प्रकरणात चौकशी करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी यांच्या मागणीनुसार एसआयटीची स्थापना केली आहे. या एसआयटीच्या प्रमुखपदी आयपीएस पंकज कुमावत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. लवकरच एसआयटीची समिती चौकशीसाठी परळीमध्ये दाखल होणार असल्याची माहिती आहे. दरम्यान, या हत्या प्रकरणातील संशयीत आरोपी गोट्या गित्ते याचा शोध स्थानिक गुन्हे शाखेकडून घेण्यात येत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT