Nagpur News: महापालिकेचे मतदान आटोपताच आता आकडेमोड केली जात आहे. कुठल्या पक्षाच्या किती जागा येणार यावर दावे प्रतिदावे केले जात आहे. अनेक संस्थांचे एक्झिट पोल समोर आले आहेत. त्यानुसार नागपूरमध्ये भाजप शंभरी गाठण्याची शक्यता कमी असल्याचे दर्शवल्या जात आहे. हा भाजपसाठी मोठा धक्का मानला जातो. भाजपने यावेळी १२० नगरसेवकांचे टार्गेट ठेवले होते हे विशेष.
मागील निवडणुकीत भाजपचे सर्वाधिक १०८ नगरसेवक निवडून आले होते. काँग्रेसचे २९, बसपाचे १०, शिवसेनेचे दोन, राष्ट्रवादीचा एक आणि एक अपक्ष नगरसेवक निवडून आला होता. यावेळी भाजपने १२० नगरसेवक निवडून आणण्याचे टार्गेट ठेवले होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपच्या अनेक नेते आम्ही ११० पर्यंत जाऊ असे सांगू असे सांगत होते. मात्र मतदानानंतरच्या अंदाजाने भाजपची झोप उडाली आहे. अनेक एक्झिट पोल कंपन्यांनी ९० ते ९५ अशी भाजपची आकडेवारी समोर ठेवली आहे. याचा फायदा थेट काँग्रेसला होणार आहे. २९वरून काँग्रेस ४० ते ४५चा आकडा गाठेल असा दावा केला जात आहे.
भाजपने वाटलेल्या तिकिट वाटपावरुन कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झालेला असंतोष, बंडखोरी याचा फटका भाजपला बसताना दिसत आहे. भाजपचे बंडखोरांनी यावेळी नेत्यांचेही ऐकले नाही. अनेकांना बड्या नेत्यांना उमेदवारी मागे घेणार नाही असे थेट नेत्यांना सुनावले.
भाजपने तिकीट वाटपात केलल्या मनमानीमुळे नागपूरमध्ये मोठ्या प्रमाणात क्रॉस व्होटिंगही झाले आहे. काँग्रेसने यावेळी उमेदवारी वाटप करताना प्रत्येक मतदारसंघातील प्रमुख नेत्याचे मत घेतले. प्रबळ उमेदवारालाही विश्वासत घेऊन इतर उमेदवारांची निवड केली. जातीय समीकरणही साधल्याने भाजपची संख्या दुप्पट होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.