Vasai–Virar Politics : ठाकूरांना मिळणार ठाकरेंची ताकद; 'मातोश्री'चे दूत विरारमध्ये! भाजपला रोखण्यासाठी नवे समीकरण!

Uddhav Thackeray Hitendra Thakur Alliance : आगामी स्थानिक स्वराज संस्था निवडणुकीसाठी वसई-विरारमध्ये नवीन आघाडी समोर येत आहे. उद्धव ठाकरेंच्या शिलेदारांनी युतीची चाचपणी करण्यासाठी आपले शिलेदार हितेंद्र ठाकूर यांच्याकडे पाठवले होते.
Uddhav Thackeray Hitendra Thakur
Uddhav Thackeray Hitendra Thakursarkarnama
Published on
Updated on

Local Body Election : एकमेकांच्या विरोधात लढलेले बविआ आणि शिवसेना उद्धव बाळासाहे ठाकरे पक्ष हे पक्ष एकत्र येण्याच्या हालचालींना वेग आला आहे. जिल्ह्यात भाजपची वाढती लोकप्रियता आणि बविआची झालेली पीछेहाट तसेच ठाकरे गटालाही पुन्हा उभारी मिळावी यासाठी हे दोन्ही पक्ष एकत्र निवडणूक लढविण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे.

पालघर जिल्ह्यातील नगरपरिषदा, नगरपंचायती, जिल्हा परिषद व पंचायत समित्या तथा त्यानंतर होवू घातलेल्या वसई-विरार शहर महापालिका निवडणूक अशा अनेकविध निवडणुकांच्या संदर्भात चर्चा करण्यासाठी ठाकरेंच्या पक्षाचे पालघर जिल्हा संपर्क प्रमुख विलास पोतनीस, पालघर जिल्हा निवडणूक यंत्रणा प्रमुख अमोल गजानन किर्तीकर यांनी बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष माजी आमदार हितेंद्र ठाकूर यांची विरार येथे भेट घेवून चर्चा केली.

शिवसेनेचे माजी खासदार विनायक राऊत यांच्या सूचनेनुसार पोतनीस व किर्तीकर यांनी हितेंद्र ठाकूर यांच्याशी आगामी काळात राजकीय सोयरीक करण्याबाबत चाचपणी केली. या एकूणच प्रकाराकडे 'मातोश्री'चे दूत विरार मध्ये या दृष्टिने पाहिलं जात असून ही ठाकरे-ठाकूर युतीची नांदी समजली जात आहे.

Uddhav Thackeray Hitendra Thakur
Uddhav Thackeray : इगतपुरीत एका रात्रीत उलथापालथ! भाजपची ‘जादूची कांडी’ फिरली अन् ठाकरेंच्या विश्वासू माजी नगराध्यक्षाने साथ सोडली

बविआने यापूर्वीच उद्धव ठाकरे हे भविष्य काळात राज्याचे मुख्यमंत्री असावेत अशी भूमिका घेतलेली आहे.आगामी काळात, भाजपा प्रणित महायुतीला स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सर्व प्रकारच्या राजकीय सत्तेपासून दूर ठेवण्याचा प्रस्ताव शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने बहुजन विकास आघाडीला दिल्याची माहिती आहे. बहुजन विकास आघाडी पक्षाची देखील असल्याने आगामी काळात पालघर जिल्ह्यात ठाकरे-ठाकूर एकत्र येण्यास अडचण नसल्याची स्थिती आहे.

मविआ-बविआ युती होणार

वसई पूर्व चिंचोटी येथे बुधवारी मविआमधील विविध घटक पक्ष व बहुजन विकास आघाडी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांसदर्भात बैठक झाली. यावेळी मविआ व बविआ एकत्र येण्याबाबत मविआ व बविआ या दोन्ही पक्षांतील प्रमुख मंडळींनी सकारात्मक भाष्य केलं.

Uddhav Thackeray Hitendra Thakur
Ajinkya Naik Political Connections : शरद पवारांनी शब्द टाकला, फडणवीसांनी सूत्र हलवली...पण अजिंक्य नाईकांचे 'गॉडफादर' वेगळेच निघाले!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com