बातमीत महत्वाचे काय?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत महादेव मुंडे आणि सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणांबाबत सविस्तर माहिती दिली आणि कुणालाही पाठीशी घातले जाणार नाही, असे ठामपणे सांगितले.
मुंडे प्रकरणात 196 जणांची चौकशी, 83 साक्षीदारांची माहिती, मोबाईल डम्प डाटा तपास यासह व्हिसेरा तपासणी सुरू असून, तपास प्रगतीपथावर आहे.
सूर्यवंशी प्रकरणात सुरूवातीला इन्ज्युरी मुळे मृत्यूचा अहवाल होता, परंतु जे.जे. रुग्णालयाच्या अंतिम अहवालात हार्ट संबंधित आजार कारणीभूत असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
Devendra Fadnavis’s Key Statements in House : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी विधानसभेत महादेव मुंडे आणि सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणाबाबत महत्वाची माहिती दिली. दोन्ही प्रकरणांमध्ये कुणालाही पाठिशी घालणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. मुंडे प्रकरणाच्या तपासामध्ये आतापर्यंत काय-काय घडलं, याची सविस्तर माहिती फडणवीसांनी दिले. तर सूर्यवंशी प्रकरणातील सद्यस्थितीबाबत त्यांनी सभागृहाला अवगत केले.
बीडमधील महादेव मुंडे यांच्या हत्येचा उलगडा अद्याप झालेला नाही. मुंडे यांच्या पत्नीने नुकताच आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यामुळे हा मुद्दा सध्या ऐरणीवर आला आहे. त्यावर बोलताना फडणवीस म्हणाले, या प्रकरणात 196 जणांकडे विचारपूस केली आहे. त्यांचा पैशांच्या देवाणघेवाणीवरून कुठे वाद झाला होता का, याबाबत 83 साक्षीदारांकडे तपास केला आहे. जे काही मोबाईल क्रमांक आहे, त्यातील 286 जणांकडे तपास केला आहे. 37 साक्षीदारांचे जबाब नोंदवले आहेत. व्हिसेरा अहवालाची पुन्हा तपासणी करणे चालली आहे.
परळीच्या एका जंगलाजवळ एका खुल्या मैदानात हा हल्ला झाला होता. प्रत्यक्ष साक्षीदार सापडला नाही. पण दीड महिन्याने एका महिलेने ही घटना पाहिल्याचे कळलं. तिने दोन व्यक्ती भांडत असल्याचे सांगितलं. आता जवळपास 150 नंबरचा डम्प डाटा तपासत आहोत. त्यामुळे मी त्यांच्या पत्नीला एवढंच आश्वासत करू इच्छितो की, कुणालाही पाठिशी घातले जाणार नाही. यासंदर्भात कारवाई केली जात आहे, असे फडणवीस म्हणाले.
परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणावरही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात महत्वाची माहिती दिली. सूर्यवंशी यांचा मृत्यू सुरूवातीच्या कारणांमध्ये शॉक फॉलोईंग मल्टिपल इन्ज्युरीज असे कारण दिले होते. त्यानंतर हिस्टोपॅथोलॉजीच्या रिपोर्टमध्ये ट्रिपल व्हेसल डिसीजचा गंभीर आजार असल्यामुळे मृत्यू झाल्याचे म्हटले आहे. म्हणून ही दोन वेगळी मते आल्याने हे दोन्ही रिपोर्ट जे.जे.शासकीय रुग्णालायत पाठविण्यात आले.
आता त्यांनी दिलेल्या रिपोर्टमध्ये सूर्यवंशी यांचा मृत्यू कोरोनरी आर्टरी डिसीज विथ अक्युट कोरोनरी सिंड्रोममुळे झाल्याचे म्हटले आहे. हा निष्कर्ष सरकारने काढलेला आहे. सरकार अजूनही अंतिम निष्कर्षाला आलेले नाही. सरकारने नेमलेल्या आयोगाचा अहवाल आल्यानंतरच अंतिम निष्कर्ष काढला जाईल, असे फडणवीसांनी स्पष्ट केले.आता त्यांनी दिलेल्या रिपोर्टमध्ये सूर्यवंशी यांचा मृत्यू कोरोनरी आर्टरी डिसीज विथ अक्युट कोरोनरी सिंड्रोममुळे झाल्याचे म्हटले आहे. हा निष्कर्ष सरकारने काढलेला आहे. सरकार अजूनही अंतिम निष्कर्षाला आलेले नाही. सरकारने नेमलेल्या आयोगाचा अहवाल आल्यानंतरच अंतिम निष्कर्ष काढला जाईल, असे फडणवीसांनी स्पष्ट केले.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न?
प्रश्न: महादेव मुंडे प्रकरणातील तपासात किती लोकांची चौकशी झाली आहे?
उत्तर: 196 जणांची चौकशी आणि 83 साक्षीदारांकडून माहिती घेतली गेली आहे.
प्रश्न: मुंडे प्रकरणातील व्हिसेरा तपासणीबाबत काय स्थिती आहे?
उत्तर: व्हिसेरा अहवालाची पुन्हा तपासणी सुरू आहे.
प्रश्न: सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूचं प्राथमिक कारण काय सांगितलं गेलं?
उत्तर: शॉक फॉलोइंग मल्टिपल इन्ज्युरीज असं प्राथमिक कारण देण्यात आलं.
प्रश्न: सरकारने अंतिम निष्कर्ष कधी देणार?
उत्तर: सरकारने नेमलेल्या आयोगाचा अहवाल आल्यानंतरच अंतिम निष्कर्ष दिला जाईल.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.