Narendra Modi on Mumbai : बिहारमध्ये जाऊन मुंबई-पुण्याविषयी काय म्हणाले पंतप्रधान मोदी? पश्चिमेकडील मुंबईप्रमाणे पुर्वेत मोतिहारी...

PM Modi’s Statement on Mumbai-Pune and Motihari : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या विधानावरून आता तर्कवितर्क लढवले जाऊ लागले आहेत. पूर्व भारताला पुढे नेण्यासाठी आपल्याला बिहारला विकसित बनवायला हवे, असे सांगताना पंतप्रधान मोदींनी मुंबई-पुण्याचाही उल्लेख केला.
devendra fadnavis | narendra modi
devendra fadnavis | narendra modisarkarnama
Published on
Updated on

Prime Minister Narendra Modi speaking in Bihar : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी बिहारमध्ये अनेक विकासकामांचा श्रीगणेशा केला. त्यांनी तब्बल 7 हजार 204 कोटी रुपयांच्या विकास योजनांची पायाभरणी व लोकार्पण केले. मोतिहारी येथे आयोजित या कार्यक्रमात बोलताना त्यांनी मोठं विधान केले आहे.

पूर्व भारताला पुढे नेण्यासाठी आपल्याला बिहारला विकसित बनवायला हवे, असे सांगताना पंतप्रधान मोदींनी मुंबई-पुण्याचाही उल्लेख केला. ते म्हणाले, जी ताकद पश्चिमेकडे होती, त्यामध्ये आता पुर्वेकडील देशांचाही दबदबा वाढत आहे. आमचा संकल्प आहे की, येणाऱ्या काळात पश्चिम भारतातील मुंबईप्रमाणे पुर्वेकडे मोतिहारीचे नाव व्हायला हवे.

गुरूग्राममध्ये ज्या संधी आहेत, तशाच संधी गयाजीमध्ये उपलब्ध व्हाव्यात. पुण्याप्रमाणे पटनामध्येही औद्योगिक विकास व्हावा. पूर्व भारताला पुढे नेण्यासाठी आपल्याला बिहारला विकसित बिहार बनवावे लागेल, असा संकल्प नरेंद्र मोदींनी यावेळी व्यक्त केला. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या विधानावरून आता तर्कवितर्क लढवले जाऊ लागले आहेत.

devendra fadnavis | narendra modi
Assembly Session update : जयंत पाटील मध्येच बोलताना पाहून फडणवीस प्रचंड संतापले; म्हणाले, सर्व आमदार माजलेत असं...

हिंदी भाषेच्या मुद्द्यावरून महाराष्ट्रातील राजकारण काही दिवसांपूर्वी तापले होते. त्यावरून हिंदी भाषिक लोकांना मारहाणीचा मुद्दा उपस्थित करत भाजपचे खासदार निशीकांत दुबे यांनी मुंबई, महाराष्ट्राविषयी वादग्रस्त विधान केले होते. टीका करताना त्यांनी बिहार-गुजरातचाही उल्लेख केला होता.

महाराष्ट्रातील ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांच्या गळ्यात नुकतीच राज्यसभेच्या खासदारकीची माळ पडली आहे. पंतप्रधान मोदींनी त्यांचे अभिनंदन करण्यासाठी पोन केल्यानंतर हिंदीतून बोलू की मराठीत, असा प्रश्न विचारल्याचे निकम यांनीही माडियाशी बोलताना सांगितले होते.

devendra fadnavis | narendra modi
Bhaskar Jadhav News : अश्लील, अर्वाच्य... होय, मी चुकलो! कबुली देत भास्कर जाधवांनी जाहिरपणे मागितली अध्यक्षांची माफी...

पंतप्रधान मोदी यांनी बिहारमध्ये जाऊन मुंबई-पुण्याचा उल्लेख करण्यामागेही आता वादाचा संदर्भ जोडला जात आहे. पंतप्रधानांनी इतर शहरांची नावे घेतली असली तरी त्यांनी मुंबई-पुण्याचा उल्लेख करणे, महत्वाचे मानले जात आहे. महाराष्ट्रामध्ये बिहारमधील अनेक नागरिक आहेत. त्यांचे मतदान बिहारमध्ये आहे. अनेकांची कुटुंबे बिहारमध्ये आहेत. बिहारमधून महाराष्ट्रात प्रामुख्याने मुंबई-पुण्यात येणाऱ्यांची संख्या अधिक आहे. 

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com