DCM Devendra Fadnavis  Sarkarnama
महाराष्ट्र

Devendra Fadnavis : 'आमच्याकडे मतांचा पाऊस...' देवेंद्र फडणवीसांचा शरद पवारांना टोला

Devendra Fadnavis Criticized Sharad Pawar : लाडक्या बहिणीने जरा सावध राहा. बाजारात तुमचे सावत्र भाऊ फिरत आहेत. तुतारी वाले, मशालीवाले आणि हातवाले हे तुमचे सावत्र भाऊ आहेत, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Rahul Gadkar

Devendra Fadnavis News : मला एका गोष्टीचा आनंद आहे की ज्या लोकांनी धर्मांना विरोध केला, देव देवतांना नावे ठेवली, तेच लोक अलीकडच्या काळात रामकृष्ण हरी म्हणायला लागले. जादू चालू झालेली आहे. पण लक्षात ठेवा! इचलकरंजीच्या जनतेला माहिती आहे, साधू कोण आहे आणि संधी साधू कोण आहे, असा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला देवेंद्र फडणवीस यांनी टोला लगावला. इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार राहुल आवाडे यांच्या प्रचारार्थ सभेत ते बोलत होते.

सुरेश हळवणकर आणि प्रकाश आवाडे एकत्र आल्याने रेकॉर्ड होणारच आहे. हे राहुल आवाडे आहेत, हे पप्पू गँगवाले राहुल नाहीत. हे खटाखटवाले राहुल नाही तर फटाफटवाले राहुल आहेत. आज काल लोक सांगत आहेत पावसात भिजलो निवडून येणार, पण मी त्यांना सांगतो तुमच्याकडे तो पाऊस आहे पण आमच्याकडे मतांचा पाऊस आहे. निवडून येण्यासाठी मतांचा पाऊस लागतो, असा असे देखील देवेंद्र फडणवीस म्हणाले.

लाडक्या बहिणीने जरा सावध राहा. बाजारात तुमचे सावत्र भाऊ फिरत आहेत. तुतारी वाले, मशालीवाले आणि हातवाले हे तुमचे सावत्र भाऊ आहेत. लाडक्या बहिणीच्या विरोधात ते न्यायालयात गेले. पण सावत्र भावांचा डाव साधला नाही. कारण सख्खे भाऊ इथे आहेत, असे फडणवीसांनी सांगितले.

व्होट जिहाद विरुद्ध धर्मयुद्ध करा

मूठभर लोकांच्यासाठी मिंदे राहून ते जर व्होट जिहाद करणार असतील तर आपल्याला मतांचे धर्मयुद्ध करावे लागेल. आता जर थांबलो तर संपून जाऊ. आता जर झोपलो तर पुन्हा उठणार नाही. ही जर वेळ गमावली तर पुढची पिढी आपल्याला माफ करणार नाही.ही निवडणूक राहुल आवाडे यांची नाही ही आमच्या अस्तित्वाची लढाई आहे हे आमचे धर्मयुद्ध आहे, असे आवाहन फडणवीसांनी केले.

फडणवीस म्हणाले 'लाव रे तो व्हिडिओ'

देवेंद्र फडणवीस म्हणाले, मौलाना सज्जद नोमानीने याने 10 मागण्याचा पत्रक महाविकास आघाडीला दिले आहे. यातील सगळ्यात घातक मागणी म्हणजे 2012 ते 2024 मधील दंगलीतील सर्व मुसलमान आरोपींना निर्दोष मुक्त करा आणि हिंदूंना आरोपी करा अशी आहे. महाविकास आघाडीने त्यांना लेखी आश्वासन दिले. अरे तुम्हाला शरम वाटली पाहिजे, असे सांगत फडणवीस यांनी लाव रे ते व्हिडिओ अशी गर्जना केली. या व्हिडिओमध्ये मौलाना सांगतात भारतीय जनता पार्टीला मतदान दिला तर त्यांच्यावर सामाजिक बहिष्कार टाका, असे आव्हान ते करताना दिसतात. असे फडणवीस म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT