Manipur Violence : ‘एनडीए’मध्ये फूट; मणिपूर हिंसेमुळे नाराज मित्रपक्षाने काढला सरकारचा पाठिंबा, भाजपसमोर संकट

National Peoples Party N Biren Singh BJP NDA Alliance : मणिपूरमध्ये पुन्हा हिंसा भडकल्याने राज्य तसेच केंद्र सरकारचीही कोंडी झाली आहे. आता त्याचे राजकीय पडसादही उमटू लागले आहेत. 
Manipur NPP Letter
Manipur NPP LetterSarkarnama
Published on
Updated on

New Delhi : मागील अनेक महिन्यांपासून अशांत असलेल्या मणिपूरमध्ये पुन्हा हिंसा सुरू झाली आहे. त्याचा पहिला राजकीय फटका आता सत्ताधारी भाजप सरकारला बसला आहे. एनडीएमधील मित्रपक्ष असलेल्या नॅशनल पीपल्स पार्टीने मणिपूरमधील भाजप सरकारचा पाठिंबा काढत असल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे भाजपला मोठा धक्का बसला आहे.

मुख्यमंत्री एन. बीरेन सिंह यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकार सध्याची स्थिती नियंत्रणात आणण्यात अपयशी ठरल्याने तातडीने पाठिंबा मागे घेत असल्याचे ‘एनपीपी’ने जाहीर केले आहे. या पक्षाचे विधानसभेत सात आमदार आहेत. पक्षाने भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी पक्ष लिहून आपला निर्णय कळवला आहे.

Manipur NPP Letter
Manipur Violence : मणिपूर पेटले, अमित शाह प्रचार अर्धवट सोडून दिल्लीत; राज्याने केली मोठी मागणी

'एनपीपी'ने पत्रात मणिपूरमधील बिघडलेल्या कायदा-सुव्यवस्थेवर नाराजी व्यक्त केली आहे. मागील काही दिवसांपासून आम्ही राज्यातील स्थिती अधिक बिघडताना पाहत आहोत. यामध्ये अनेक निरपराध लोकांचा जीव गेला आहे. राज्यातील लोक अनेक अडचणींचा सामना करत आहेत. राज्य सरकार लोकांच्या समाधान करण्यात पूर्णपणे अपयशी ठरल्याचे पत्रात म्हटले आहे.

सध्याची स्थिती पाहता आम्ही मणिपूर बीरेन सिंह यांच्या नेतृत्वाखालील सरकारचा पाठिंबा तात्काळ मागे घेत असल्याचे 'एनपीपी'ने या पत्रातून स्पष्ट केले आहे. दरम्यान, शनिवारी राज्यात अचानक मोठी हिंसा भडकली. त्यानंतर राज्यांतील काही जिल्ह्यांमध्ये कर्फ्यू लावण्यात आला असून दोन दिवस इंटरनेट सेवाही बंद करण्यात आल्या आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह महाराष्ट्राचा दौरा अर्धवट सोडून दिल्ली गेले आहेत.

Manipur NPP Letter
Rahul Gandhi : बाळासाहेब ठाकरेंविषयी मोदींकडून आव्हान; पुण्यतिथीनिमित्त राहुल गांधींची पोस्ट चर्चेत

भाजप सरकारला धोका नाही

एनपीपी पक्षाने भाजप सरकारचा पाठिंबा काढला असला तरी सरकारला कोणताही धोका नाही. भाजपकडे बहुमताच्या जादुई आकड्यापेक्षा अधिक आमदार आहे. 2022 च्या निवडणुकीत भाजपचे 32 आमदार निवडून आले होते. तर एनपीपीला सात जागा मिळाल्या होत्या. मात्र, असे असले तरी भाजपमधील आमदारांमध्येही नाराजीचे वातावरण आहे. त्यामुळे राज्यातील भाजप सरकारसमोर संकट उभे राहण्याची भीती आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com