Mahayuti And Mahavikas Aghadi  Sarkarnama
महाराष्ट्र

Phalodi Satta Bazar : युती की आघाडी? राज्यात कोणाचं सरकार? 'फलोदी'ने वर्तवला मोठा अंदाज

Phalodi predicts who will form government in the state: मागील महिनाभरापासून महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी सुरू असलेल्या प्रचाराच्या तोफा सोमवारी थंडावल्या आहेत. तर राज्यात उद्या 20 नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडणार आहे. मतदानाआधीच राज्यात आमचंच सरकार येणार, असा महाविकास आघाडी आणि महायुतीकडून दावा केला जात आहे.

Jagdish Patil

Maharashtra Assembly Election 2024 : मागील महिनाभरापासून महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी सुरू असलेल्या प्रचाराच्या तोफा सोमवारी थंडावल्या आहेत. तर राज्यात उद्या 20 नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकीसाठी मतदान (Voting) पार पडणार आहे. मतदानाआधीच राज्यात आमचंच सरकार येणार, असा महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) आणि महायुतीकडून दावा केला जात आहे.

अशातच आता राज्यात कोणाची सत्ता येणार याबाबत फलोदी सट्टा बाजाराने मोठा अंदाज वर्तवला आहे. फलोदी सट्टा बाजारात देशातील विविध विधानसभा निवडणुकीचा निकाल काय असेल याबाबतचा अंदाज वर्तवला जातो. या सट्टा बाजाराने नुकत्याच पार पडलेल्या हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या निकालाचा अंदाज देखील वर्तवला होता.

अशातच आता त्यांनी महाराष्ट्रात कोणाची सत्ता येणार याबाबतचा अंदाज वर्तवला आहे. या बाजाराच्या दाव्यानुसार राज्यात पुन्हा एकद महायुतीची (Mahayuti) सत्ता येण्याची शक्यता आहे. तर महाविकास आघाडीला या निवडणुकीत बहुमत न मिळण्याचा अंदाज या सट्टा बाजारात वर्तवला गेला आहे. मात्र, फलोदी सट्टा बाजाराने हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या निकालाबाबत जो अंदाज वर्तवला होता तो खोटा ठरला होता.

त्यामुळे आता महाराष्ट्रातील निवडणुकीबाबत त्यांनी वर्तवलेला अंदाज खरा ठरणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. फलोदी सट्टा बाजाराच्या अंदाजानुसार राज्यात महायुतीला 288 पैकी 144 ते 152 जागा मिळू शकतात. तर राज्यात बहुमतासाठी 145 जागांची आवश्यकता असते त्यामुळे हा अंदाज खरा ठरल्यास पुन्हा एकदा महायुती सत्ता स्थापन करू शकते.

तसंच भाजपला (BJP) 87 ते 90 जागा मिळू शकतात असा अंदाज वर्तवला गेला आहे. तसंच या निवडणुकीत महाविकास आघाडी महायुतीला चांगलीच टक्कर देणार असल्याचंही सांगितलं जात आहे. महाराष्ट्रातील सत्तास्थापनेसाठी महायुतीवर 40 पैसे तर आघाडीवर 2 ते 2.50 रुपयांचा भाव लागत असल्याचं सांगितलं जात आहे.

तसंच झारखंडमध्येही भाजपला 55 जागा मिळू शकतात आणि भाजप झारखंडमध्येही एकहाती सत्ता सरकार स्थापन करेल अशी शक्यता या बाजारातून व्यक्त केली जात आहे. मात्र, या फलोदी सट्टा बाजाराने वर्तवलेला अंदाज खरा ठरणार की खोटा हे 23 नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर स्पष्ट होणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT