Vinod Tawde : विनोद तावडेंकडून पैशांचे वाटप? विरारमध्ये राडा, 'बविआ'कडून गंभीर आरोप

Vinod Tawde distributing 5 crore in Virar : बहुजन विकास आघाडीने विनोद तावडे यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे.
Assembly Election
Assembly ElectionSarkarnama
Published on
Updated on

Vinod Tawde Live Update: मतदानाला अवघे काही तास बाकी असतानाच भाजपचे राष्ट्रीय नेते विनोद तावडे यांच्यावर पैसेवाटपाचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत. बहुजन विकास आघाडीने हे आरोप केले असून त्याचे व्हिडिओही समोर आले आहेत. यावरून विरारमधील एका हॉटेलमध्ये मोठा राडा झाला आहे. पोलिसांनी या हॉटेलचा ताबा घेतला आहे.

विरारमध्ये एका हॉटेलमध्ये विनोद तावडे पैसे वाटत असल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीने केला आहे. बविआ कार्यकत्यांनी घेरल्याचे व्हिडिओ समोर आले आहेत. त्यावरून जोरदार राडा सुरू आहे. कार्यकर्त्यांकडून तावडेंना घेरण्यात आले होते. तावडेंनी मात्र या आरोपांचे खंडन केले आहे. याठिकाण पोलिस दाखल झाले असून बविआ आणि भाजपच्या कार्यकर्त्यांना आवरण्याचा प्रयत्न करत आहेत.

Assembly Election
Kolhapur Politics: पाटलांची भावनिक साद की नरकेंचा विकास; करवीरच्या जनतेला काय भावणार?

बविआ कार्यकर्त्यांकडून पैसे आणि पाकिटे दाखविली जात असल्याचे व्हिडिओही समोर आले आहेत. त्यामुळे आता यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. बविआचे नेते हितेंद्र ठाकूर यांनी आपल्याला विनोद तावडेंचा फोन आला होता, असा दावा केला आहे. तावडेंनी आपली माफी मागितल्याचा दावाही ठाकूर यांनी केला आहे.  

या प्रकरणावरून आता राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी महायुतीवर शरसंधान साधले आहे. तर युतीचे नेते सावरासावर करताना दिसत आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी याप्रकरणी कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

Assembly Election
Kagal Assembly Election 2024 : घाटगे की मुश्रीफ; वस्तादाचा खरा पठ्ठ्या कोण?

क्षितिज ठाकूर हॉटेलमध्ये

बविआचे आमदार क्षितिज ठाकूरही हॉटेलमध्ये दाखल झाले आहेत. तावडे यांच्याकडे पैसे आणि पाकिटे आढळून आल्याचा आरोप बविआकडून केले जात आहेत. यावेळी भाजप आणि बविआ कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाजी झाल्याचेही समजते. ठाकूर यांनी पोलिसांशी वाद झाल्याचे समोर आले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com