Manoj Jarange Patil sarkarnama
महाराष्ट्र

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील निवडणूक लढण्याच्या तयारीत? म्हणाले, 'कागदपत्र तयार ठेवा...'; उद्याच इच्छुक उमेदवारांशी चर्चा

Manoj Jarange Patil Politics: गुरुवारी विधानसभेसाठी इच्छुक उमेदवारांनी सकाळी 9 ते सायंकाळी चार या वेळेत उपस्थित राहावे, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.

Roshan More

Mumbai News: मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे म्हणून आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील आचारसंहिता लागू झाल्याने आपली भूमिका जाहीर करणार आहेत. विधानसभेला उमेदवार उभे करायचे की पाडापाडी करायची, याचा निर्णय मनोज जरांगे पाटील रविवारी (ता. 20) घेणार आहेत.

मनोज जरांगे पाटील हे निर्णय जरी रविवारी घेणार असले तरी मोठा पाऊल उचलत त्यांनी उद्या (गुरुवारी) इच्छुक उमेदवारांना आंतरवाली सराटीमध्ये बोलावले आहे. मला ज्यांनी अर्ज केले होते. जे इच्छुक आहेत त्यांच्याशी मला उद्या महत्त्वाच्या गोष्टीवर चर्चा करायची आहे.

गुरुवारी विधानसभेसाठी इच्छुक उमेदवारांनी सकाळी 9 ते सायंकाळी चार या वेळेत उपस्थित राहावे, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले. ज्यांना शक्य आहे त्यांनी उद्या यावे. आपली उमेदवारी फिक्स झाली, असे कोणी समजू नये. आपण मिळून निर्णय घेऊ, असे देखील मनोज जरांगे पाटील म्हणाले.

इच्छुक उमेदवारांनी आपली कागदपत्र तयार ठेवायची आहेत. कारण उभा राहायचं ठरलं तर कागदपत्र तयार पाहिजेत. कारण उमेदवारी अर्ज भरण्यासाठी कमी वेळ हातात आहे, असे जरांगे पाटील म्हणाले.

मला समाजाला खर्चात पाडायचे नाही. रविवारी (ता.20) उमेदवार उभे करायचे की पाडायचे याचा निर्णय घेऊ. त्यामुळे रविवारी समाज बांधवांनी यावे. आपण नारायण गडावर आपली शक्ति दाखवली आहे. त्यामुळे या बैठकीला ज्यांना शक्य आहे त्यांनी यावे विनाकारण खर्चात पडू नये. बैठकीचे ठिकाण लवकरच कळवले जाईल, असे देखील जरांगे पाटील म्हणाले.

महायुतीने मांडले रिपोर्ट कार्ड

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये आज महायुतीचे पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेमध्ये मुख्यमंत्र्यांनी आपल्या कामाचे रिपोर्ट कार्ड ठेवले. टोलमाफी, महिला, युवक, कामगार यांच्यासाठी आणलेल्या कल्याणकारी योजना राबवून महायुतीने सर्वसामान्य जनतेसाठी काय केले, याची माहिती मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT