J&K Oath Ceremony : भाजपला ताकद दिलेल्या जम्मूला अब्दुल्लांकडून मोठं गिफ्ट; काश्मीरमध्ये ऐतिहासिक शपथविधी

Omar Abdullah Jammu and Kashmir CM Surendra Chaudhary : ओमर अब्दुल्ला यांनी बुधवारी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.
Omar Abdullah oath taking Ceremony
Omar Abdullah oath taking CeremonySarkarnama
Published on
Updated on

Srinagar News : जम्मू आणि काश्मीरमध्य सहा वर्षांनंतर बुधवारी नवे सरकार अस्तित्वात आले. नॅशनल कॉन्फरन्सचे उपाध्यक्ष ओमर अब्दुल्ला यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांच्या सरकारमध्ये जम्मू विभागाला काय मिळणार, अशी चर्चा होती. पण अब्दुल्लांनी जम्मूला मोठं गिफ्ट देत सर्वांनाच धक्का दिला आहे.

अब्दुल्ला हे जम्मू आणि काश्मीर केंद्रशासित प्रदेशाचे पहिले मुख्यमंत्री ठरले. जम्मूतील सुरेंद्र चौधरी यांच्या गळ्यात उपमुख्यमंत्रिपदाची माळ टाकण्यात आली आहे. त्यांच्याशिवाय चार आमदारांनी बुधवारी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. जावेद डार, सकीना इटू, जावेद राणा आणि सतीश शर्मा यांना मंत्री करण्यात आले आहे. आज मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा पार पडला.

Omar Abdullah oath taking Ceremony
S Jaishankar in Pakistan : जयशंकर यांचा पाकिस्तानात स्वॅग; काल ऐटीत एन्ट्री, आज रस्त्यावर मॉर्निंग वॉक...

जम्मू आणि काश्मीर विधानसभा निवडणुकीत नॅशनल कॉन्फरन्स-काँग्रेस आघाडीला 49 जागांवर विजय मिळाला आहे. तर भाजपला केवळ 29 जागा मिळाल्या आहेत. भाजपला मिळालेल्या सर्व जागा जम्मू विभागातील आहेत. तर नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेसला सर्वाधिक जागा श्रीनगरमध्ये मिळाल्या आहेत. त्यामुळे मंत्रिमंडळामध्ये जम्मूला काही मिळणार का, याबाबत उत्सुकता होती.

जम्मूतील नौशेरा मतदारसंघात भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र रैना यांचा पराभव करणारे सुरेंद्र चौधरी यांनाच उपमुख्यमंत्री करत अब्दुल्लांनी सर्वांचीच तोंडे बंद केली आहेत. अब्दुल्ला यांचा या निर्णयाला महत्व प्राप्त झाले आहे. कारण जम्मूत भाजपची ताकद मोठी आहे. त्याला शह देण्यासाठी चौधरींना सरकारमध्ये महत्वाचे स्थान दिल्याचे मानले जात आहे.

Omar Abdullah oath taking Ceremony
Jammu-Kashmir Politics: जम्मू-काश्मीरमध्ये मोठा ट्विस्ट, काँग्रेस ओमर अब्दुल्लांच्या सरकारमध्ये सामील होणार नाही; कारण...

काँग्रेस कॅबिनेटमध्ये नाही

जम्मू आणि काश्मीरच्या निवडणुकीत अपेक्षित यश न मिळालेल्या काँग्रेसने कॅबिनेटमध्ये सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेसच्या सहा आमदारांचा सरकारला बाहेरून पाठिंबा असेल. नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेसने आघाडी करत निवडणूक लढवली होती. पण काँग्रेसला मागील निवडणुकीत मिळालेल्या जागाही टिकवता आल्या नाहीत.

इंडियाची एकजुट

आजच्या शपथविधी सोहळ्यात इंडिया आघाडीतील अनेक नेते उपस्थित होते. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासह सरचिटणीस प्रियांका गांधी, समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव, आपचे खासदार संजय सिंह, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे डी. राजा, निवडणुकीत सुपडा साफ झालेल्या पीपल्स डेमोक्रेटिक पार्टीच्या प्रमुख मेहबुबा मुफ्ती यांच्यासह आघाडीतील इतर पक्षांचे नेतेही सहभागी झाले होते.  

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com