NCP Sharad Pawar Sarkarnama
महाराष्ट्र

NCP SP Candidate List: मोठी बातमी! राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची दुसरी उमेदवार यादी जाहीर, काँग्रेसला 'दे धक्का'

NCP SP Candidate List Assembly Election : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची 45 उमेदवार यादी जाहीर करण्यात आली होती. या यादीनंतर पक्षाची दुसरी यादी आज (शनिवारी) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जाहीर केली.

Roshan More

NCP SP Candidate List : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची 45 उमेदवार यादी जाहीर करण्यात आली होती. या यादीनंतर पक्षाची दुसरी यादी आज (शनिवारी) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जाहीर केली. या यादीमध्ये 22 उमेदवारांची नावे घोषित करण्यात आली आहेत.

बीडमधून संदीप क्षीरसागर, येवल्यामधून माणिकराव काळे, जुन्नरमधून सत्यशील शेरकर, खडकवासला सचिन घोडके, पर्वतीमधून अश्विनी कदम, माळशिरसमधून उत्तम जानकर यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. काँग्रेसकडून पर्वती मतदारसंघातून आबा बागुल यांनी दावा सांगितला होता. मात्र, ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने आपल्याकडेच ठेवला आहे.

मतदारसंघ उमेदवार

एरंडोल - सतीश अण्णा पाटील

गंगापूर - सतीश चव्हाण

शहापूर -पांडुरंग बरोरा

परांडा -राहुल मोटे

बीड - संदीप क्षीरसागर

आर्वी - मयुरा काळे

बागलान - दीपिका चव्हाण

येवला - माणिकराव शिंदे

सिन्नर - उदय सांगळे

दिंडोरी - सुनीता चारोस्कर

नाशिक पूर्व - गणेश गीते

उल्हासनगर -ओमी कलानी

जुन्नर - सत्यशील शेरकर

पिंपरी - सुलक्षणा शीलवंत

खडकवासला -सचिन दोडके

पर्वती -अश्विनीकदम

अकोले - अमित भांगरे

अहिल्या नगर शहर- अभिषेक कळमकर

माळशिरस -उत्तमराव जानकर

फलटण -दीपक चव्हाण

चंदगड - नंदिनी भाबुळकर कुपेकर

इचलकरंजी - मदन कारंडे

67 जागांवर उमेदवार जाहीर

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून पहिल्या यादीमध्ये 45 उमेदवारांची घोषणा करण्यात आली होती. दुसऱ्या यादीत 22 उमेदवारांची घोषणा करण्यात करण्यात आली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून 67 उमेदवार निश्चित झाले आहेत. महाविकास आघाडीत प्रत्येक पक्षाच्या वाट्याला 90 पेक्षा अधिक जागा येण्याची शक्यता आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची तिसरी यादी देखील लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT