Congress Candidate List : आमदार कानडेंच्या मुंबईत गाठीभेटीवर भर; म्हणाले, 'प्रामाणिकपणाचा काँग्रेसकडून विश्वासघात'

Shrirampur MLA Lahu Kanade reaction to being rejected by Congress and Hemant Ogale reaction to being nominated : काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी कापल्यानंतर श्रीरामपूरचे आमदार लहू कानडे यांची आणि उमेदवारी मिळाली म्हणून युवा नेते हेमंत ओगले यांची पहिली प्रतिक्रिया समोर.
 MLA Lahu Kanade
MLA Lahu KanadeSarkarnama
Published on
Updated on

Ahilyanagar News : काँग्रेसने उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. यात अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर या राखीव मतदारसंघातून काँग्रेसचे विद्यमान आमदार लहू कानडे यांची उमेदवारीचे तिकीट कापलं आहे.

युवा नेते हेमंत ओगले यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या दोघांच्या प्रतिक्रिया समोर आल्या आहेत. काँग्रेसने उमेदवारी नाकारल्यानंतर आमदार कानडे चांगलेच 'अ‍ॅक्शन मोड'वर आले असून मुंबईत गाठीभेटीवर भर दिला आहे.

काँग्रेसने (Congress) विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. यात 23 जणांना उमेदवारी जाहीर केली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील राखीव श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातून विद्यमान आमदार लहू कानडे यांना उमेदवारी नाकारली आहे. त्यांच्याऐवजी युवा नेते हेमंत ओगले यांना संधी देण्यात आली आहे. यावर आमदार लहू कानडे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. तसंच त्यांनी मुंबईत हालचाली वाढवल्या असून, संघर्षाची तयारी ठेवली आहे.

 MLA Lahu Kanade
Congress Candidate List : काँग्रेसच्या 'या' विद्यमान आमदाराचा पत्ता कट, युवा चेहऱ्याला संधी

आमदार कानडे म्हणाले, "पुन्हा संधी देण्याची भावना असताना पक्षाच्या दिल्लीस्थित नेत्यांनी एका पक्षनिष्ठ आणि प्रामाणिक कार्यकर्त्याचा विश्वासघात केला. ही अत्यंत वेदना देणारी बाब आहे. महाराष्ट्राच्या विधानमंडळामध्ये आचार्य अत्रेनंतर जनतेमधून निवडून गेलेला मी एकमेव सदस्य ठरलो". विधानमंडळात मागील 20 वर्ष बंद पडलेला श्रीरामपूरचा आवाज जनतेचे प्रश्न मांडून पुन्हा बुलंद केला. त्यामुळे पुन्हा मायबाप मतदारांच्या न्यायालयात माझ्यावर पक्षाने केलेल्या अन्यायाच्या विरोधात सोमवारी (ता. 28) उमेदवारी अर्ज भरून न्याय मागणार आहे, असे आमदार कानडे यांनी म्हटले.

 MLA Lahu Kanade
Sandeep Kotkar : मनसुब्यावर पाणी फिरलं, संदीप कोतकरांना न्यायालयापाठोपाठ कोतवाली पोलिसांचा दणका

घराण्याचा घरगडी द्यायचा आहे का?

काँग्रेसशी एकनिष्ठ कसा राहिलो, हे सांगताना आमदार कानडे म्हणाले, "काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यापासून अत्यंत प्रामाणिकपणे पक्ष नेतृत्वाशी व पक्षाच्या विचाराशी एकनिष्ठ राहिलो. मतदारसंघात लोकप्रतिनिधी म्हणून काम करताना कधी जबाबदारी समजून भेदभाव न करता सर्वांची कामे केली". मायबाप जनतेला त्यांचा लोकप्रतिनिधी निवडून द्यायचा आहे की, पुन्हा एखाद्या घराण्याचा घरगडी निवडून द्यायचा आहे, याचा फैसला मायबाप जनताच करेल, याची मला खात्री आहे. पक्षाने केलेल्या अन्यायाविरुद्ध जनताच न्याय करेल, असेही आमदार कानडे यांनी म्हटले.

'इतिहास पुन्हा घडवू'

आमदार कानडे यांच्यापाठोपाठ ज्यांना उमेदवारी मिळाली, ते हेमंत ओगले यांची देखील प्रतिक्रिया समोर आली आहे. हेमंत ओगले यांनी संयमाने प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, "पक्षाशी एकनिष्ठ राहिल्याचे फळ मिळाले. गेली 17 वर्षांपासून काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहिल्याचे फळ उमेदवारीच्या रुपाने मिळाले.संघटनेशी गेल्या 25 वर्षांपासून जो बांधील राहिला तो काँग्रेसचा उमेदवार आमदार म्हणून निवडून आल्याचा आजवरचा इतिहास आहेत. तो इतिहास पुन्हा घडवू".

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com