Raj Thackeray Sarkarnama
महाराष्ट्र

Raj Thackeray : राज ठाकरे 'या' पक्षासोबत कंम्फर्टेबल, स्वतःच सांगितलं कारण

Maharashtra Assembly Election Raj Thackeray MNS BJP : लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठींबा दिला होता. मात्र विधानसभेला मनसे महायुतीचा भाग नाही. मनसे स्वबळावर लढत आहे.

Roshan More

Raj Thackeray News : स्वबळावर निवडणुकी लढणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये आमच्या पाठींब्याशिवाय महायुतीचे सरकार स्थापन होणार नाही, असे म्हटले आहे.

मी कोणासोबत कम्फर्टेझोन पाहत असेल तर तो भाजपसोबत, मी भाजपसोबत हा कंम्फर्टेबल आहे, असे देखील राज ठाकरे म्हणाले आहेत.

राज ठाकरे म्हणाले की, मी शिवेसेनेत होते आणि त्यानंतर माझा पक्ष काढला तेव्हा माझे कोणासोबत चांगले संबंध होते तर ते भाजप नेत्यांसोबत. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या नेत्यांसोबत आपले कधीच जवळचे संबंध आले नाहीत, असे देखील राज म्हणाले.

लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठींबा दिला होता. मात्र विधानसभेला मनसे महायुतीचा भाग नाही. मनसे स्वबळावर लढत आहे. याविषयी बोलताना राज ठाकरे म्हणाले की, लोकसभेला पाठींबा देताना मी विधानसभेचा विचार केला नव्हता. विधानसभा स्वबळावल लढणार हे मी आधीच निश्चित केले होते.

भाजपचाच मुख्यमंत्री होणार

राज ठाकरे यांनी याआधी देखील एका वृत्त वाहिनीच्या मुलाखतीमध्ये महायुतीचे सरकार सत्तेत येईल. तसेच भाजपचा मुख्यमंत्री होईल, असा दावा केला होता. 2029 मध्ये मनसेचा मुख्यमंत्री होईल, असे राज ठाकरे म्हणाले होते.

अमित ठाकरेंना पाठींबा नाही

लोकसभेला राज ठाकरेंनी महायुतीला बिनशर्त पाठींबा दिला होता. विधानसभा निवडणुकीत मनसेच स्वबळावर लढत आहे. मात्र, माहीम मतदारसंघात राज ठाकरे यांचे पुत्र अमित यांना महायुती पाठींबा देईल अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र, येथे महायुतीकडून शिवसेनेचे उमेदवार सदा सरवणकर निवडणूक लढवत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT