Manikrao Kokate: 'माणिकराव कोकाटे यांनी जिल्हा बँक बुडवण्याचे पाप केले'

Sinnar Assembly constituency: सिन्नर मतदार संघातील निवडणूक आता आरोप आणि प्रत्यारोपानी गाजू लागली आहे.
Manikrao Kokate & Uday Sangle
Manikrao Kokate & Uday SangleSarkarnama
Published on
Updated on

Nashik News: सिन्नर विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उदय सांगळे यांच्या प्रचारासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची सभा झाली. यावेळी श्री सांगळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे उमेदवार माणिकराव कोकाटे यांच्यावर गंभीर आरोप केले. सख्ख्या भावाचा झाला नाही, तो मतदारसंघाचा काय होईल? असा गंभीर आरोप त्यांनी केला.

सिन्नर मतदार संघाची निवडणूक आता अचानक चुरशीच्या वळणावर पोहोचली आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची सभा झाली. यावेळी श्री पवार यांनी (कै) तुकाराम दिघोळे, (कै) सूर्यभान गडाख यांसह विविध नेत्यांचे सिन्नरच्या विकासातील योगदान सांगितले. मात्र या सभेत उमेदवार सांगळे यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार आमदार कोकाटे यांच्यावर केलेल्या आरोपांनी खळबळ उडाली.

Manikrao Kokate & Uday Sangle
Shivsena Politics: बहिणीचा प्रश्न, `तीन हजार कोटीची कामे करूनही आमदार किशोर पाटील अस्वस्थ का`

श्री सांगळे यांनी आमदार माणिकराव कोकाटे यांचा चांगलाच समाचार घेतला. पाऊस पडल्यामुळे आलेल्या पुराच्या पाण्याचे श्रेय देखील जलदूत म्हणून कोकाटे घेत आहेत. अन्य लोकांनी केलेल्या नदीजोड प्रकल्प आपण केल्याचे आमदार सांगतात. अनेक न केलेल्या कामांचे श्रेय आमदार कोकाटे घेण्याचा प्रयत्न करतात, याची मला कीव वाटते, असे ते म्हणाले.

Manikrao Kokate & Uday Sangle
Keda Aher Politics: दहा संचालक विधानसभेचे उमेदवार; आजारी जिल्हा बँकेविषयी निवडणुकीत मौन!

ते पुढे म्हणाले, आमदार कोकाटे यांनी उमेदवारी अर्जासोबत प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. त्यात सहा गंभीर गुन्हे त्यांच्या विरोधात दाखल असल्याची माहिती देण्यात आली आहे. यामध्ये सर्वात गंभीर गुन्हा हा आर्थिक फसवणुकीचा आहे. जिल्हा बँक आर्थिक अडचणीत आणून बुडविण्याचे पाप करण्यामध्ये आमदार कोकाटे यांचा सहभाग आहे. सर्वसामान्य शेतकरी आणि नागरिकांना उपलब्ध असलेला आर्थिक मदतीचा हात जिल्हा बँक करते. आज ती सुविधा बंद झाली आहे. हे पाप आमदार कोकाटे यांनी केले आहे.

आमदार कोकाटे यांच्यावर ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे उपकार आहेत. मागच्या निवडणुकीत पवार यांनी त्यांना आशीर्वाद दिले नसते, तर ते दोन हजार मतांनी निवडून आले नसते. मात्र शरद पवार यांचे उपकार देखील आमदार कोकाटे मान्य करत नाही. शरद पवार यांचा पॅटर्न सिन्नरला चालणार नाही, असे ते सांगतात याचा खेद वाटतो.

यावेळी श्री सांगळे यांनी शरद पवार यांनी आमदार कोकाटे यांना मदत केली. ते त्यांचे उपकार मानत नाही.त ज्या तालुक्याने त्यांना आमदार केले, त्या तालुक्याचे उपकार मान्य करायला तयार नाही. अहो जो भारत कोकाटे यांच्यासारख्या सख्या भावाचा होऊ शकत नाही, तो मतदारसंघाचा काय होईल? असा गंभीर प्रश्न सांगळे यांनी केला.

सिन्नर मतदार संघात निवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहोचला आहे. दोन्ही बाजूंनी आरोप प्रत्यारोप होऊ लागले आहेत. त्यामुळे ही निवडणूक अतिशय चुरशीच्या वळणावर पोहोचली आहे. उमेदवार सांगळे आणि कोकाटे यांच्यात थेट आरोप- प्रत्यारोप होऊ लागल्याने मतदारांत देखील तो चर्चेचा विषय आहे. श्री. सांगळे यांच्या आजच्या आरोपांना आमदार कोकाटे काय उत्तर देतात, याची आता सगळ्यांनाच प्रतीक्षा असेल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com