ED, Cash for Votes Sarkarnama
महाराष्ट्र

ED Raid in Maharashtra: पैसे घ्या, मतं द्या! निवडणुकीच्या रणधुमाळीत ED ची मुंबईसह नाशिक, मालेगावमध्ये छापेमारी

Kirit Somaiya alleges 125 crore Vote Jihad scam in Malegaon: भाजप नेते किरीट सोमय्या यांनी बुधवारी माळेगाव येथे 125 कोटी रुपयांचा व्होट जिहाद घोटाळा झाल्याचा आरोप केला होता.

Rajanand More

New Delhi : लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात ‘व्होट जिहाद’ या शब्दाने डोकं वर काढले. प्रामुख्याने भाजप नेत्यांनी त्यावरून महाविकास आघाडीला धारेवर धरले. आता विधानसभा निवडणुकीतही हा मुद्दा समोर आला असून भाजप नेते किरीट सोमय्या यांनी बुधवारी 125 कोटींच्या व्होट जिहाद घोटाळ्याचा आरोप केला. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी ईडीने मुंबई, नाशिकसह देशभरातील 13 ठिकाणी रेड टाकली.

मालेगाव येथील दोघांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे 12 निरपराथ तरुणांच्या नावाने नाशिक मर्चंट कोऑपरेटिव्ह बँकेच्या मालेगाव शाखेत खाती उघडल्याचे किरीट सोमय्या यांनी बुधवारी म्हटले होते. सात राज्यांतील 175 बॅंक शाखांमधून 2500 व्यवहारांच्या माध्यमातून 125 कोटी रुपये मिळाले. हे पैसे काढून हवालाच्या माध्यमातून महाराष्ट्रात पाठवण्यात आल्याचा आरोप सोमय्यांनी केला होता.

ऑक्टोबर 2024 मध्ये हे व्यवहार झाले असून त्याचा वापर व्होट जिहाद चळवळीसाठी होण्याची भीती असल्याचेही सोमय्या यांनी म्हटले होते. याबाबत आपण तपास यंत्रणांकडे तक्रार केल्याचेही त्यांनी सांगितले होते. या तक्रारीच्या आधारेच ईडीने रेड टाकल्याचे समजते. ईडीने मालेगाव, नाशिक आणि मुंबईतील पाच ठिकाणांवर रेड टाकल्याचे वृत्त ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेने दिले आहे.

मते विकत घेण्यासाठी आर्थिक अनियमितता झाली आहे किंवा नाही, याबाबतचे पुरावे गोळा करण्यासाठी ईडीकडून ही छापेमारी करण्यात आली आहे. यामध्ये पैशांच्या व्यवहारांची साखळी, लाचखोरी आणि इतर आर्थिक व्यवहारांचा तपास केला जाणार आहे. मतदारांना पैशांचे अमिष दाखवण्याच्या घटनांच्या अनुषंगाने ही छापेमारी सुरू आहे.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीनंतर भाजपने व्होट जिहाद वरून महाविकास आघाडीला घेतले होते. मुस्लिम समाजाची एकगठ्ठी मते महाविकास आघाडीला मिळाल्याचा दावा भाजपकडून करण्यात आला होता. या मतांमुळे आपला पराभव झाल्याचे सांगताना सोमय्या यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही विविध मतदारसंघातील आकडेवारी समोर मांडली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT