Pankaja Munde : योगींच्या ‘बटेंगे तो कटेंगे’ नाऱ्याला पंकजा मुंडेंचा विरोध; म्हणाल्या...

Pankaja Munde opposes Yogi Adityanath's 'Batenge To Katenge' slogan: महायुतीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनीही आधीच या नाऱ्याचा विरोध केला आहे.
Yogi Adityanath, Pankaja Munde
Yogi Adityanath, Pankaja MundeSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत दिलेला ‘बटेंगे तो कटेंगे’ हा नारा भाजपमधील नेत्यांनाच पचनी पडलेला नाही. त्यावर या नेत्यांकडून आता उघडपणे नाराजी व्यक्त केली जाऊ लागली आहे. भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी अशा नारेबाजीची गरज नसल्याचे ठाम मत मांडले आहे.

महायुतीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनीही आधीच या नाऱ्याचा विरोध केला आहे. आता भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनीही विरोधी सूर आळवला आहे. एका इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी याबाबत आपली भूमिका स्पष्ट केले. आम्ही त्या पक्षाचे आहोत, म्हणून या नाऱ्याचे समर्थन करू शकत नाही, असे त्यांनी म्हटले आहे.

Yogi Adityanath, Pankaja Munde
Sanjay Raut : संजय राऊत यांचा सवाल, मंत्री गिरीश महाजन यांनी केले तरी काय?

पंकजा मुंडे यांनी विकास हाच प्रमुख असल्याचे सांगितले. त्या म्हणाल्या, येथील प्रत्येक व्यक्तीला आपले समजणे, हे नेत्याचे काम आहे. महाराष्ट्रात अशाप्रकारेच मुद्दे येता कामा नयेत. योगी आदित्यनाथ यांनी हे उत्तर प्रदेशसंदर्भात म्हटले होते. तिथे वेगळ्या प्रकारची राजकीय स्थिती आहे. त्यांच्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढला जात असल्याचेही मुंडे यांनी म्हटले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जात-धर्म न पाहता सर्वांना रेशन, घर, सिलेंडर दिले आहेत, असे सांगताना पंकजा यांनी योगी आदित्यनाथ यांच्या विधानावरून पंतप्रधान मोदींच्या योजनांकडे लक्ष देण्याबाबचे सूचक विधानही केले. दरम्यान, पंकजा मुंडे यांच्या आधी अजित पवार यांनीही बटेंगे तो कटेंगे वरून नाराजी व्यक्त केली होती. तर महाविकास आघाडीने योगींवर निशाणा साधला होता.

Yogi Adityanath, Pankaja Munde
Kalyan Rural Vidhansbha Election: उमेदवारांमध्ये जुंपली! कल्याण ग्रामीणचे राजकीय वातावरण तापलं...

एक है तो सेफ है

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून प्रत्येक प्रचारसभेत ‘एक है तो सेफ है’ असा नारा दिला जात आहे. काँग्रेसकडून जाती-जातींना लढवण्याचा हेतू असल्याचा आरोप मोदींकडून केला जात आहे. त्यानंतर महायुतीकडून वृत्तापत्रांमध्ये याबाबतची जाहिरातही दिली होती. त्यामुळे महायुतीने प्रचाराचा अजेंडा सेट केल्याचे दिसते. आता बहुतेक नेत्यांकडून प्रचारात हा नारा दिला जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com