Chandrashekhar Bawankule Sarkarnama
महाराष्ट्र

Chandrashekhar Bawankule : सरकार स्थापनेला उशीर का होतोय? बावनकुळेंनी सगळंच सांगितलं...

Maharashtra Assembly Election Mahayuti Mahavikas Aghadi Chief Minister : महायुतीला बहुमत मिळूनही सत्तास्थापनेला विलंब होत असल्याने अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. मुख्यमंत्रिपदावरून महायुतीत तिढा असल्याची चर्चा आहे.

Rajesh Charpe

Nagpur News : विधानसभेच्या निवडणुकीत महायुती बहुमताने निवडून आली आहे. सत्तास्थापन करण्यासाठी आवश्यक असलेला आकडा असल्याने तात्काळ मुख्यमंत्र्यांचे नाव, मंत्रिमंडळ जाहीर होईल, अशीच अपेक्षा सर्वांना होती. मात्र तीन दिवस उलटूनही मुख्यमंत्री कोणाला करायचे, याचा निर्णय झालेला नाही.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी कोण मुख्यमंत्री होणार आणि केव्हा होणार, यासाबोतच सत्तास्थापन व्हायला उशिरा का होत आहे, याचे कारण सांगितले. बावनकुळे म्हणाले, तीन पक्षांचे सरकार बनवताना थोडा वेळ लागतोच. मंत्रिपदं कशी वाटायची, कोणाला कोणते खाते द्यायचे, पालकमंत्री कुठे आणि कोणाला नेमायचे, हे सर्व सूत्र तयार करून सरकार तयार होते.

नुसतेच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचे नाव निश्चित करून भागत नाही. यात थोडा वेळ जाणार आहे.  लवकरच सरकार स्थापन होईल. शपथ नोव्हेंबर मध्ये होईल की डिसेंबर महिन्यात हे काही पॅरामीटर नाही. सध्या काळजीवाहू सरकारचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत, असेही बावनकुळे यांनी सांगितले.

भाजपच्या कार्यकर्त्यांना देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री व्हावेत असे वाटते. महायुतीमधील मित्रपक्षांच्या कार्यकर्त्यांची त्यांचे नेते मुख्यमंत्री व्हावेत, अशी इच्छा आहे. यावर तिन्ही पक्षाचे नेते बसून निर्णय घेतील. केंद्रीय नेतृत्वाने घेतलेल्या निर्णयावर भाजपाचा कार्यकर्ता कधीच नाराज होत नाही. त्यांचा निर्णय अंतिम असतो. पक्षाचे नेते योग्य निर्णय करतात, असे बावनकुळे म्हणाले.

लवकरच महायुतीचा मुख्यमंत्री शपथ घेईल. उद्धव ठाकरेंनी जेव्हा भाजपसोबत बेईमानी केली, तेव्हा त्यांना सरकार बनवण्यासाठी दीड महिना लागला होता, असाही टोला बावनकुळे यांनी लगावला. महायुती सरकार उत्तम काम करू शकते, हा विश्वास असल्यानेच महाराष्ट्रातील 14 कोटी जनतेने मते दिली आहेत, असेही ते म्हणाले.

महाविकास आघाडीकडून ईव्हीएमवर अविश्वास दाखवून मतदारांचा अपमान केला जात आहे. लोकसभेच्या पराभवाचे आम्ही आत्मचिंतन केले, त्यातून शिकलो व पुढे गेलो आणि जिंकलो. जनतेने महाविकास आघाडीचा करेक्ट कार्यक्रम केला आहे तसेच 440 व्होल्टचा करंटही दिला असल्याचे बावनकुळे यांनी सांगतिले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT