
Congress Politics : विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची मोठी पिछेहाट झाली आहे. काँग्रेस अवघ्या 11 जागांवर विजय झाला आहे. तर, काँग्रेसच्या वाट्याला अवघी 12 टक्के मतं आली आहेत. काँग्रेसची राज्यात मोठी पिछेहाट झाल्याने काँग्रेसच्या पक्ष संघटनेत मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे. नाना पटोलेंचे प्रदेशाध्यक्ष पद धोक्यात आहे, असे वृत्त 'साम टिव्ही'ने सुत्रांच्या हवाल्याने दिली आहे.
निकालानंतर नाना पटोले यांनी आपल्या प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देऊ केला होता. मात्र, त्यावर पक्षश्रेष्ठींनी अजून कोणताही निर्णय घेतला नाही. मात्र, नाना पटोले यांच्याबद्दल नेते अंतर्गत तक्रारी करत आहेत. जागा वाटपामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने आक्रमक भूमिका घेतील असताना काँग्रेसने नरमाईची भूमिका घेतली, असा आरोपही पटोलेंवर करण्यात आला आहे.
ओबीसी चेहरा असल्याने काँग्रेस नेतृत्वाने पटोलेंच्या बाबत निर्णय घेतला नाही. मात्र, कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचणारे नवे नेतृत्व आणा, अशी मागणी होत आहे. त्यामुळे काँग्रेस भाकरी फिरवणार का? याची चर्चा सुरू आहे.
राज्यातील तब्बल 21 जिल्ह्यातून काँग्रेस हद्दपार झाली आहे. या 21 जिल्ह्यात काँग्रेसचा एकही आमदार विजयी झाला नाही. पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेसला मोठा फटका बसला आहे.
महाविकास आघाडीला 50 जागा मिळाल्या आहेत. विरोधी पक्षनेते पदासाठी महाविकास आघाडीतील कोणत्याही पक्षाला 29 जागा मिळवता आल्या नाहीत. त्यामुळे विधानसभेत विरोधी पक्षनेता नसणार आहे.
महापालिका आणि जिल्हा परिषद या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झालेल्या नाहीत. विधानसभेत महायुतीने मिळवलेल्या ग्रँड यशाने त्यांचा काॅन्फिडन्स वाढलेला आहे. त्यामुळे सरकार स्थापनेनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याच्या हालचाली सुरू करण्यात येतील. त्यामुळे या निवडणुकांना मित्रपक्षांच्या सोबत जाऊन लढायच्या की स्वबळावर याचा निर्णय काँग्रेसला घ्यावा लागणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.