Mallikarjun kharge narendra Modi sarkarnama
महाराष्ट्र

Mallikarjun Kharge : 'पुतळा पडला, राम मंदिर गळायला लागलं', मल्लिकार्जुन खर्गेंचे मोदी-शहांना प्रत्युत्तर

Mallikarjun Kharge Criticized Amit Shah Narendra Modi : महाविकास आघाडीची गॅरंटी म्हणजे भ्रष्टाचाराची, ध्रुवीकरणची, खोटेपणाची गॅरंटी असल्याचे अमित शाह म्हणाले आहेत.

Roshan More

Mallikarjun Kharge News: विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात जाहीरसभांमधून गृहमंत्री अमित शाह हे राम मंदिर बनवायले हवे होती की नाही, असा प्रश्न विचारत आहे. पाच वर्षात नरेंद्र मोदींनी राम मंदिराचा मुद्दा निकालात काढला, असे म्हणत आहेत. त्याला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी उत्तर दिले आहे.

मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले, लोक म्हणतात यांचा हात जेथे लागतो ते काम खराब होतं. यांनी राम मंदिर बांधलं राममंदिर गळायला लागलं. शिवाजी महाराजांचा पुतळा उभारला तो पडला. हे म्हणतात आम्ही संसद बांधली. तुम्ही बांधली हे मान्य पण ती पण गळायला लागली. गळायचे काम का करता? क्वालिटीचे काम का नाही करत? असा सवाल देखील खर्गे यांनी विचारला.

अमित शाह आपल्या जाहीर सभांमधून काँग्रेसने दिलेल्या पाच गॅरंटीची खिल्ली उडवत आहेत. महाविकास आघाडीची गॅरंटी म्हणजे भ्रष्ट्राचाराची, ध्रुवीकरणाची गॅरंटी असल्याचे शाह म्हणत आहेत. तसेच बटेंगे तो कटेंगेचा नारा देखील अमित शाह आपल्या जाहीर सभांमधून देत आहेत.

भाजपकडून अपप्रचार

मल्लिकार्जून खर्गे यांनी भाजपकडून काँग्रेसने इतर राज्यात राबवलेल्या योजनांबाबत अपप्रचार केला जात असल्याचे सांगितले. कर्नाटक, तेलंगणा, हिमाचल प्रदेश इथे काँग्रेसने दिलेले आश्वासन पाळले आहे. योजनांवर होणाऱ्या खर्चाची आकडेवारी देखील मल्लिकार्जून खर्गे यांनी सादर केली आहे.

‘बटेंगे तो कटेंगे'चा समाचार

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपल्या जाहीस सभेमधून 'बटेंगे तो कटेंगे'चा घोषणा देत 'एक हे तो सेफ हे'चा नारा देत आहेत. भाजपच्या या प्रचाराला काँग्रेसकडून 'जुडेंगे तो बढेंगे'च्या नाऱ्याने उत्तर दिले जात आहे. मल्लिकार्जुन खर्गे भाजप नेत्यांना उद्देशून म्हणाले मारणारे आणि वाटणारे तुम्हीच आहात. आम्ही आधीपासून एकच आहोत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT