Uddhav Thackeray Sabha : सांगोल्याच्या गद्दाराचा माज उतरवायला अन गाडायला मी आलोय; उद्धव ठाकरेंचा शहाजीबापूंवर घाणाघात

Assembly Election 2024 : हा महाराष्ट्र कधीही गद्दाराला क्षमा करत नाही. गद्दाराने गुवाहाटीचा डोंगर पाहिला. पण इथल्या रायगडाचं टकमक टोक नाही पाहिलं. ते तुला २३ तारखेला दिसणार आहे.
Uddhav Thackeray_shahaji Patil
Uddhav Thackeray_shahaji PatilSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 10 November : किती माज असावा. लय म्हणजे एकदमच लयच. पण, ज्यांनी त्याला मोठं केलं होतं, त्याला माहिती नव्हतं की ही जनता त्याचा माजसुद्धा उतरवू शकते. मी त्याचा माज उतरवायाला आलो आहे. मी इथल्या गद्दाराला गाडायला आलो आहे. गद्दारांच्या छताडावर भगवा रोवायला मी सांगोल्यात आलो आहे. येत्या २३ तारखेला सांगोल्याची जनता गद्दाराचा कडेलोट करणार आहे, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांच्यावर हल्लाबोल केला.

सांगोला मतदारसंघातील महाविकास आघाडीतील शिवसेनेचे उमेदवार दीपक साळुंखे यांच्यासाठी आयोजित प्रचार सभेत उद्वव ठाकरे हे बोलत होते. त्या सभेत बोलताना ठाकरेंनी भाषणाच्या सुरुवातीलाच शहाजीबापू पाटलांवर टीकास्त्र सोडले.

उद्धव ठाकरे म्हणाले, रेल्वेत कोणाची ओळख आहे का? येत्या २३ तारखेचं एक तिकिट पाहिजे, तेही गुवाहाटीचं. परत जाऊ द्याना. काय झाडी काय डोंगर..., त्यांना परत जाऊ दे गुवाहाटीला. बसा तिकडे जाऊन झाडं मोजत. प्रत्येकाचं एक नशीब असतं. देव संंधी देत असतो. त्या संधीचं सोनं करायचं की माती हे ज्यांचं त्यांनं ठरवायचं.

गेल्या वेळी एका गद्दाराला आपण उमेदवारी दिली, तुम्ही सर्वांनी त्याला संधी दिली. त्याने फक्त त्या संधीचं नाही, तर आयुष्याचाच मातेरे केलं आहे. किती माज असावा. लय म्हणजे एकदमच लयच. पण ज्यांनी त्याला मोठं केलं होतं, त्याला हे माहित नव्हतं की ही जनता त्याचा माजसुद्धा उतरवू शकतात. मी त्याचा माज उतरवयाला आलो आहे. मी सांगोल्याच्या गद्दाराला गाडायला आलो आहे. गद्दाराला काय वाटलं. सगळे लोक गद्दार आहेत, असेही ठाकरे म्हणाले.

उद्धव ठाकरे म्हणाले, महाराष्ट्राचा इतिहास आहे, हा महाराष्ट्र कधीही गद्दाराला क्षमा करत नाही. गद्दाराने गुवाहाटीचा डोंगर पाहिला. पण इथल्या रायगडाचं टकमक टोक नाही पाहिलं. ते तुला २३ तारखेला दिसणार आहे. ही जनता २३ तारखेला तुझा कसा राजकीय कडेलोट करणार आहे, तेच बघ तू. मग तुझी काय मस्ती होती ती उतरेल. काय दिलं नव्हतं. सगळं दिलं होतं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com