Raj Thackeray Sarkarnama
महाराष्ट्र

Raj Thackeray : राज ठाकरे सभेसाठी आले पण व्यासपीठावर गेलेच नाही, दोन मिनिटात संपवलं भाषण!

Maharashtra Assembly Election Raj Thackeray Bhiwandi Rally : राज ठाकरे यांनी मनसेच्या कार्यकर्त्यांना गाफील न राहण्याचे आवाहन केले. ते म्हणाले, माझी तब्येत ठीक नाही त्यामुळे मी भाषण न करता तुमची भेट घेऊन जातोय.

Roshan More

Raj Thackeray News: विधानसभा निवडणुकीचा प्रचार मनसेकडून जोरदार सुरू आहे. राज ठाकरेयांच्या जाहीर सभा होत आहेत. मात्र, आज भिवंडीमध्ये असलेल्या सभेला राज ठाकरे आले पण व्यासपीठावर न जात खाली असलेल्या मनसेसैनिकांना भेटून परत गेले. राज यांची प्रकृती ठीक नसल्याने ते व्यासपीठावर गेले नाहीत.

राज ठाकरे यांनी मनसेसैनिकांना सांगितले की, माझी प्रकृती ठीक नसल्याने मी पुढे सुद्धा अशाच पद्धतीने फक्त भेटी घेण्यासाठी जाणार आहे. कुठे पुढच्या जाहीर सभेमध्ये भाषण करणार नाही.

राज ठाकरे यांनी मनसेच्या कार्यकर्त्यांना गाफील न राहण्याचे आवाहन केले. ते म्हणाले, माझी तब्येत ठीक नाही त्यामुळे मी भाषण न करता तुमची भेट घेऊन जातोय. माझे सहकारी तुम्हाला सांगतील. पण तुम्ही 20 तारखेला गाफील राहू नका. मनसेच्या सर्व उमेदवारांना विजयी करा.

कल्याणमध्ये सभा

तब्येत ठीक नसल्याने राज ठाकरे यांच्या पुढच्या सभा होणार की नाही याबाबत स्पष्टता नव्हती. मात्र, राज यांची कल्याणमध्ये सभा झाली. या सभेच्या सुरवातीलाच राज ठाकरेंनी भिवंडीमधील सभेत काय झाले हे सांगितले. ते म्हणाले, मी गेलो पण मला गळाल्या सारखं झालं. पाणी प्यायलो. माझं डोक दुखत होतं. मी कळवलं की मला सभा घेता येणार नाही. मी त्यांना सांगितलं मी सगळ्यांना भेटेन आणि निघेन. गोळी घेतल्यावर मला बरं वाटलं.

शिवाजी पार्कवरील सभा रद्द

राज ठाकरे हे 17 सप्टेंबरला शिवाजी पार्कवर मनसेची सांगता सभा घेणार होते. त्यासाठी महापालिकेकडे परवानगी देखील मनसेने मागितली होती. महापालिकेडून सभासाठी परवानगी देण्यात आली. मात्र, सभेच्या तयारीसाठी पुरेसा वेळ नसल्याचे कारण देत मनसेकडून शिवाजी पार्कवर होणारी सभा रद्द करण्यात आली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT