Mumbai News : विधानसभा निवडणुकीचा निकाल अवघ्या काही मिनिटांवर आहे. तोच महाविकास आघाडीकडून मुख्यमंत्रीपदावर मोठं भाष्य झालं आहे.
काँग्रेसचे सरचिटणीस सचिन पायलट यांनी 'मविआ'ला बहुमत मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त करताच, कोणतीही वेळ न दवडता मुख्यमंत्रीपदाचा चेहरा एका दिवसात जाहीर करणार असल्याचा म्हटले आहे. सचिन पायलट यांनी महाराष्ट्रात 'मविआ'साठी दोन डझनच्यावर प्रचारसभा घेतल्या होत्या.
सचिन पायलट यांच्याकडे विधानसभा निवडणुकीत मराठवाडा विभागाची जबाबदारी होती. पायलट यांनी महाराष्ट्र, झारखंड आणि पोटनिवडणुका होत असलेल्या मतदारसंघात अनेक ठिकाणी प्रचारसभा घेतल्या होत्या. एक्झिट पोलच्या अंदाजानुसार झारखंड आणि महाराष्ट्रात महायुतीच्या बाजूने कौल दिसतो आहे. तसंच महाविकास आघाडीला (MVA) देखील एकाही ठिकाणी कल दिसतो. त्यामुळे एक्झिट पोलमध्ये देखील चुरस दिसते.
सचिन पायलट यांनी एक्झिट पोलचे दावे फेटाळून लावत, महाराष्ट्र, झारखंड आणि पोटनिवडणुकांमध्ये मतदार भाजप (BJP) महायुतीला त्यांची खरी जागा दाखवले, असा विश्वास सचिन पायलट यांनी म्हटले आहे. हरियाणा निवडणुकीचा निकाल पाहिल्यास, तो धक्कादायक असाच होता. परंतु महाराष्ट्र आणि झारखंडमधील निवडणूक वेगळी झाली. त्यामुळे इथला निकाल वेगळा असेल, असा विश्वास सचिन पायलट यांनी म्हटले आहे.
महाराष्ट्रात भाजपप्रणीत डबल इंजिन सरकारने नागरिकांच्या अपेक्षांची पूर्ती केली नाही. येथील मतदारांना बदल अपेक्षित होता. तो आजच्या निकालात दिसेल, असा विश्वास सचिन पायलट यांनी व्यक्त केला. महाविकास आघाडीला बहुमत मिळताच कोणताही वेळ न घालवता एका दिवसात मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करणार असल्याचेही सचिन पायलट यांनी म्हटले.
भाजपकडे झारखंडमध्ये विश्वासार्ह चेहरा नाही. झारखंडमध्ये विद्यमान मुख्यमंत्र्यांना तुरुंगात टाकण्यात आले. परंतु सर्वोच्च न्यायालयाने त्यांना दिलासा दिला. केंद्रीय तपास यंत्रणेचा गैरवापर करणाऱ्या भाजप महायुतीला मतदार झारखंडमध्ये दणका देतील. तसेच झारखंडसह महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सराकर स्थापन करण्याची चांगली स्थिती आहे, असे सांगून महाराष्ट्रात महाविकास आघाडीचेच सरकार येईल, असे सचिन पायलट यांनी म्हटले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.