Sanjay Raut & Ajit Pawar Sarkarnama
महाराष्ट्र

Sanjay Raut : 'वाघासारखी डरकाळी फोडणाऱ्या अजितदादांना आता भीती वाटते', संजय राऊतांनी साधला निशाणा

Sanjay Raut Criticized Ajit Pawar : पालकमंत्री राहिलेले चंद्रकांत पाटील हे कोथरूडमधून पराभूत होत आहेत. त्यांना हिमालयात जावं लागेल, अशी टीका संजय राऊत यांनी केली.

Sudesh Mitkar

Pune News : महाविकास आघाडीच्या पुण्यातील उमेदवारांच्या प्रचारासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत आज (शुक्रवारी) पुणे दौऱ्यावर आहेत. कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघांमध्ये कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला संबोधित करताना राऊत यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला.

संजय राऊत म्हणाले, उपमुख्यमंत्री अजित पवार हे पुण्याचे पालकमंत्री आहेत. ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते तेव्हा त्यांच्या भाषा पाहिली तर ते वाघासारखे डरकाळी फोडायचे. मात्र जेव्हापासून ते कमळाबाईच्या नादाला लागले आहे. तेव्हापासून डरकाळी सोडा त्यांना मांजरी सारखं म्याव करायला ही भीती वाटते.

गुंडशाही, झुंडशाही, भ्रष्टाचार आणि कोयता गँग याला पुण्यातील जनता विटली आहे. ससून हॉस्पिटल हे ड्रग्स केंद्र बनला आहे.पोलिसांवर देखील हल्ले होत आहेत. पुण्याची ओळख ही सभ्य लोकांचा शहर अशी होती. मात्र गेल्या काही काळामध्ये या ठिकाणच्या राज्यकर्त्यांनी या पुण्याला बदनाम करण्याचे काम केले आहे. भाजप ही वाळवी असून त्याचे किडे पुण्याला पोखरण्याचे काम करत आहे, असे संजय राऊत म्हणाले.

पालकमंत्री राहिलेले चंद्रकांत पाटील हे कोथरूडमधून पराभूत होत आहेत. त्यांना हिमालयात जावं लागेल. मात्र हिमालय ही पवित्र जागा असून त्या ठिकाणी पापी लोकांना स्थान नसल्याची टीका राऊत यांनी केली.

'मविआ'च्या मागे उभा राहा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महाराष्ट्र आपल्या खिशात असल्यासारखा वाटत आहे. तर गृहमंत्री अमित शहा हे महाराष्ट्र विकत घ्यायला निघाले आहेत. त्यांनी मुंबई विकायला काढली असून ते पुणे देखील विकतील. त्यामुळे पुणेकरांनी सावध राहणं आवश्यक आहे. मुंबईकरांनी आणि कोकणकरांनी ठरवलं असून आता पुण्याची लोक ज्ञानी असून त्यांनी जास्त विचार करू नये. महाविकास आघाडीच्या पाठीशी उभं राहावे, असे आवाहन राऊत यांनी केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT