sharad pawar | devendra fadnavis  sarkarnama
महाराष्ट्र

Sharad Pawar Video : 'व्होट जिहाद'चा मुद्दा उपस्थित करणाऱ्या फडणवीसांना शरद पवारांनी सुनावलं, म्हणाले, 'पुण्यात भाजपाला विशिष्ट समाजाचे...'

Sharad Pawar Criticized Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस यांच्याकडून व्होट जिहाद होत असेल तर आपल्याला धर्मयुद्ध करावे लागेल, असे आवाहन आपल्या खडकवासला मतदारसंघातील सभेमध्ये केले होते.

Roshan More

Sharad Pawar News : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आपल्या जाहीर सभांमध्ये व्हिडिओ क्लीप ऐकवत 'व्होट जिहाद' केला जात आहे. व्होट जिहाद केला जात असेल तर आपण धर्मयुद्ध करायला हवं, असे आवाहन केले जात आहे. व्होट जिहादच्या आरोपावरून शरद पवार यांनी पुणे शहरातील विशिष्ट भागातील समाज भाजपला मतदान करतो, असे म्हणत देवेंद्र फडणवीसांना टोला लगावला आहे.

शरद पवार म्हणाले, 'व्होट जिहाद' हा शब्द देवेंद्र फडणवीस यांनी काढला. तो इतर कोणी काढला नाही. त्याचं कारण काही मतदारसंघात अल्पसंख्याक समाजाने महाविकास आघाडीच्या लोकांना मतदान केलं. पुणे शहरात काही भागात विशिष्ट समाज, हिंदू समाज आहे. त्याने भाजपला मतदान केलं. आम्हाला त्याची सवय आहे. येथे असच मतदान होतं. याचा अर्थ लगेच आम्ही याला जिहाद समजत नाही.'

'विशिष्ट समाज भाजपला मतदान करतो म्हणून आम्ही त्याला धार्मिक रंग देत नाही. तिथल्या लोकांची विचारधारा आहे. त्यामुळे वोट जिहाद हा शब्द वापरून देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या निवडणुकीला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न केल्याचा दिसतोय', असे देखील शरद पवार म्हणाले.

'बटेंगे तो कटेंगे'ला भाजपमधूनच विरोध

भाजपकडून विधानसभा निवडणुकीमध्ये बटेंगे तो कटेंगाचा नारा देत होती. या नाऱ्यातून मुस्लिम विरुद्ध हिंदू ध्रुवीकरण केले जात असल्याचा आरोप होत होता. भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी बटेंगे तो कटेंगे ही घोषणा आपल्याला मान्य नसल्याचे म्हटले होते. तसेच भाजप खासदार अशोक चव्हाण यांनी देखील या घोषणेला विरोध असल्याचे सांगितले होते. महायुतीमधील भाजपचे मित्र अजित पवार यांना देखील या घोषणेवर आक्षेप घेतला आहे.

धर्मयुद्ध लढावे लागणार...

देवेंद्र फडणवीस यांनी खडकवासला मतदारसंघात भाजपचे उमेदवारासाठी घेतलेल्या प्रचारसभेत सज्जाद नोमानी यांचा व्हिडिओ ऐकवला. तसेच फडणवीस म्हणाले महाविकास आघाडी विजयासाठी वोट जिहादचा नारा देत आहे. या ठिकाणी वोट जिहाद होत असेल तर आपल्याला धर्मयुद्ध लढावे लागेल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT