Maharashtra Assembly Monsoon Session
Maharashtra Assembly Monsoon Session sarkarnama
महाराष्ट्र

Video Devendra Fadnavis : पोर्श अपघात प्रकरणात देवेंद्र फडणवीसांनी ए टू झेड सांगितलं, 'पोलिसांचं कुठं चुकलं'

Roshan More

Devendra Fadnavis : राज्य विधिमंडळात पुणे हिट अँड रन प्रकरणात पहिलीच लक्षवेधी मांडण्यात आली. या लक्षवेधीवरून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विरोध पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यात खडाखडी झाली. देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहाला अपघाताची सविस्तर माहिती देत अल्पवयीन आरोपीला पहाटे तीन वाजता पोलिस ठाण्यात आणले. मात्र, त्याला मेडिकलसाठी आठ वाजता नेले येथे पोलिसांचे चुकले, अशी कबुली दिली.

देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात माहिती देताना आरोपीवर 304 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच दोषी पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली असल्याची सांगितले.

देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis म्हणाले, अल्पवयीन हा 110 किलोमीटर वेगाने कार चालवत होता. अपघातानंतर त्या वेगावर ती कार लाॅक झाली. त्याचा पुरावा तसेच ज्या बारमध्ये तो बसला त्या बारचे सीसीटीव्ही, त्या बारचे बीलाचा पुरावा आपल्याकडे आहे. दुसऱ्या बारचे सीसीटीव्ही फुटेज तेथील बील आहे. कुठल्याही पुराव्याची कमतरता नाही. शिवाय मुलाचे वय कमी असताना देखील मुलाला कार चालवण्यास दिल्याने त्याच्या वडिलांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या अपघाताची जबाबदारी ड्रायव्हरने घ्यावी यासाठी त्याच्यावर दबाव टाकण्यात आला. अल्पवयीन मुलाच्या आजोबांनी ड्रायव्हरला कोंडून ठेवले. या प्रकरणात पोलिसांनी Police गुन्हा दाखल करत अपहारणाचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात अटक देखील केली आहे.

70 पबवर कारवाई

कारवाई करत 70 पबचे लायसन्स रद्द करण्यात आले आहेत. तसेच पबच्या बाहेर आर्टिफिशीयल कॅमेरे लावण्यात आले आहेत. पब कधी सुरू झाले कधी बंद झाले याचे रेकाॅर्ड राहणार आहे. तसेच पबच्या एन्ट्रीला वय तपासूनच आता सोडावे लागणार आहे. वयाच्या पुरावा पाहून एन्ट्री दिली जाणार आहे, असे देखील फडणवीस यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT