Hemant Soren Bail : हेमंत सोरेन यांना मोठा दिलासा; केजरीवालांआधी येणार जेलमधून बाहेर

Jharkhand High Court Land Scam Money Laundering Case : झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना ईडीने कथि जमीन घोटाळ्यात 31 जानेवारीला अटक केली होती.
Hemant Soren Jail
Hemant Soren JailSarkarnama
Published on
Updated on

New Delhi : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना जामीनासाठी मोठी कसरत करावी लागत असताना झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना मोठा दिलासा मिळाला आहे. कथित जमीन घोटाळाप्रकरणी झारखंड हायकोर्टाने सोरेन यांना शुक्रवारी जामीन मंजूर केला.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोरेन यांची सुटका होणार असल्याने झारखंड मुक्त मोर्चासह इंडिया आघाडीची ताकदही वाढणार आहे. सोरेन यांना ईडीने 31 जानेवारीला अटक केली होती. त्यानंतर तब्बल पाच महिन्यांनी ते जेलमधून बाहेर येणार आहेत.

Hemant Soren Jail
Parliament Session Live : राहुल गांधींचा ‘तो’ मुद्दा अन् विरोधकांचा गोंधळ; संसदेचे कामकाज करावे लागले स्थगित

जमीन घोटाळाप्रकरणी ईडीने मनी लॉन्डरिंगचा गुन्हा दाखल केला आहे. सोरेन यांच्यासह जवळपास 25 जणांना आतापर्यंत अटक केले आहे. त्यामुळे आयएएस अधिकाऱ्यांसह माजी अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. ही हे प्रकरण हायप्रोफाईल बनले आहे.

अटक केल्यानंतर सोरेन यांनी ईडीने केलेले आरोप फेटाळून लावले होते. राजकीय सुडबुध्दीने भाजपच्या केंद्र सरकारने आपल्या अटक केल्याचा आरोप सोरेन यांनी केला होता. त्यांच्या पत्नी कल्पना सोरेन यांनीही भाजप सरकारवर जोरदार टीका केली होती.

Hemant Soren Jail
Parliament Session Live : दिल्लीत पावसाचा धुमाकूळ; संसदेतही धडकणार सरकारविरोधी वादळ

दरम्यान, अटकेपुर्वी सोरेन यांनी आधी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर काही मिनिटांतच त्यांना ईडीने अटक केली होती. त्यानंतर चंपई सोरेन यांच्या गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ पडली. हेमंत सोरेन यांच्या अटकेनंतर त्यांच्या पत्नी राजकारणात सक्रीय झाल्या. नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकीत कल्पना सोरेन विजयी झाल्या आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com