Rahul Narvekar  Sarkarnama
महाराष्ट्र

Assembly Session Update : सामंतांचा मोबाईल चोरीला?, विधान भवनात प्रवेशाबाबत नार्वेकरांची मोठी घोषणा; आता कडक नियम...

Assembly Speaker Rahul Narwekar Assembly Entry : विधान भवनाच्या आवारात मंत्री आणि आमदारांसोबत, त्यांना भेटण्यासाठी येणाऱ्यांची संख्या मोठी असते.

Rajanand More

Mumbai News : विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान विधान भवन परिसरातील होणारी गर्दी टाळण्यासाठी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मोठी घोषणा केली आहे. यापुढे खूपच गरज असल्यास परवानगीशिवाय कुणालाही प्रवेश दिला जाणार नाही, असे नार्वेकर यांनी विधानसभेत जाहीर केले. दरम्यान, मंत्री उदय सामंत यांचा मोबाईल विधान भवनाच्या आवारात हरवल्याचे वृत्त आहे.

अधिवेशन काळात विधान भवनाच्या आवारात अनेकदा मोठी गर्दी झाल्याचे दिसून येते. मंत्री, आमदारांसोबत त्यांचे कार्यकर्ते तसेच त्यांच्या विभागाशी संबंधित कामे घेऊन येणारी नागरिक, काही संघटनांचे प्रतिनिधी विधान भवनात येतात. मात्र, त्यामुळे विधान भवनातील यंत्रणांवर मोठा ताण पडतो. सुरक्षेचाही प्रश्न निर्माण होतो.

यापार्श्वभूमीवर अध्यक्ष नार्वेकर यांनी गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी मोठा निर्णय घेतला. ते म्हणाले, अधिवेशन कालावधीत विधान भवनाच्या प्रांगणात होणाऱ्या गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी उपाययोजना करण्याबाबत मंत्री व सदस्यांकडून होत असलेली मागणी, विधान भवनातील सुरक्षेबाबत पोलिस यंत्रणेकडून पीठासीन अधिकाऱ्यांना सुचना प्राप्त झालेल्या आहेत.

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री, सदस्य यांची सुरक्षितता तसेच विधान भवनातील व्यवस्थांवर अतिरिक्त ताण पडतो. या सर्व बाबींचा विचार करून यापुढे परिसरातील खासगी अभ्यंगतांना अत्यंत अपवादात्मक परिस्थितीत प्रवेशाच्या निकडीची पडताळणी करून पीठासीन अधिकाऱ्यांच्या परवानगीने मान्यता देण्यात येईल. सदस्यांनी याबाबत सहकार्य करावे आणि वारंवार पासेससाठी आग्रह करू नये, अशी घोषणा विधानसभा अध्यक्षांनी केली.

मोबाईल हरवला

उद्योगमंत्री उदय सामंत यांचा मोबाईल विधान भवनाच्या आवारात हरवल्याचे वृत्त आहे. हा मोबाईल चोरीला गेला का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. विधान भवनात ही घटना घडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. सीसीटीव्हीच्या माध्यमातून मोबाईलचा शोध गेतला जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT