Maharashtra Politics News live : शिंदे गटात १०० टक्के प्रवेश करणार, आता माघार नाही - उत्तम प्रकाश खंदारे

Sarkarnama Headlines Updates : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी एकाच क्लिकवर
Maharashtra Politics News live :  शिंदे गटात  १०० टक्के प्रवेश करणार, आता माघार नाही - उत्तम प्रकाश खंदारे
Published on
Updated on

उत्तम प्रकाश खंदारे यांनी उद्धव ठाकरेंची सोडली साथ

आम्हाला दिलेल्या पदाला पक्षात किंमत नसल्याने पक्षाचा स्वतः हुन राजीनामा दिला. विनायक राऊतांनी काय पत्र काढले हे मला माहीत नाही, शिंदे गटात १०० टक्के प्रवेश करणार, आता माघार नाही. असं म्हणत उत्तम प्रकाश खंदारे यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली आहे.

सोलापूरात ठाकरे गटाला धक्का बसणार

सोलापूरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला धक्का बसणार असल्याचे संकेत आहेत. कारण, माजी मंत्री उत्तम खंदारे, जिल्हाप्रमुख अमर पाटील व माजी आमदार शिवशरण पाटील हे तिन्ही नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या वाटेवर आहेत.

11 लाख 61 हजार बालकांना जॅपनीज एन्सेफलायटीस लस देण्यात येणार

राज्यशासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार जिल्ह्यातील 1 वर्ष ते 15 वर्षाखालील बालकांना मार्च 2025 पासून जपानीज एन्सेफलायटीस लसीकरण मोहीम राबविण्यात येणार असून सर्व संबंधित विभागांनी समन्वय राखून लसीकरण मोहीम यशस्वी करावी, असे निर्देश पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले. या मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील 11 लाख 61 हजार 331 इतक्या बालकांना लस दिली जाणार आहे, अशीही माहिती त्यांनी दिली.

...तर धनंजय मुंडेंन सहआरोपी करा - लक्ष्मण हाके

संतोष देशमुख प्रकरणात जे आरोपी आहेत त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, असे लक्ष्मण हाके म्हणाले. धनंजय मुंडे यांच्या विरोधात पुरावे असतील तर त्यांना देखील सहआरोपी करा मात्र, पुरावे नसताना मीडिया ट्रायल करून कोणाला आरोपी करता येत नाही, असे लक्ष्मण हाके म्हणाले.

dhananjay deshmukh : टोकाचं पाऊल उचलू नका - धनंजय देशमुख

संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो पाहून व्यथित झालेल्या तरुणाने आत्महत्या केली. त्यामुळे संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी आवाहन करत कोणीही टोकाचे पाऊल उचले नये असे आवाहन केले. तसेच आपल्याला न्याय मिळेल असा विश्वास देखील व्यक्त केला.

Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली विधानपरिषदेत घोषणा

कोकणातील संगमेश्वर येथे असलेल्या सरदेसाई वाड्याला आता नवी झळाळी मिळणार आहे. छत्रपती संभाजी महाराजांची कैद जिथे झाली, त्या सरदेसाई वाड्यात स्मारक उभारण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत केली.

Neelam Gorhe : विरोधकांनी दिला विधीमंडळ सचिवाकंडे प्रस्ताव

विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या विरोधात विरोधकांनी अविश्वासाचा प्रस्ताव दाखल केला आहे. विधिमंडळ अधिवेशन प्रसंगी आक्रमक झालेल्या महाविकास आघाडीकडून बुधवारी विधीमंडळ सचिवाकंडे प्रस्ताव सादर करण्यात आला.

Santosh deshmukh Murder case : फोटो पाहून आत्महत्या

संतोष देशमुख हत्या प्रकरणी पोलिसांनी कोर्टात आरोपपत्र दाखल केले आहे. या आरोपपत्रासोबत पोलिसांनी देशमुखांना आरोपींनी केलेल्या मारहाणीचे फोटो सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत. हे फोटो पाहून बीडमधील एका तरुणाने टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.

Mumbai Rape Case : अल्पवयीन मुलीवर सामुहिक बलात्कार

मुंबईतील जोगेश्वरीमध्ये एका १२ वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामुहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे. त्यांच्यावर पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बलात्कार झाल्यानंतर ही मुलगी दादर स्थानकात त्रासदायक अवस्थेत चालताना आढळून आल्यानंतर पोलिसांना संशय आला होता. तपासामध्ये तिच्यावर अत्याचार झाल्याचे समोर आले.

Aaditya Thackeray News : आदित्य ठाकरे फडणवीसांच्या भेटीला

विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरूवात झाल्यानंतर आमदार आदित्य ठाकरे यांनी आज पहिल्यांदाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. ही भेट कशासाठी झाली, याबाबत अद्याप माहिती उपलब्ध झालेली नाही.

Assembly Session Update : 2100 रुपये लगेच नाहीत

महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना लगेचच २१०० रुपये मिळणार नाहीत. चालू अधिवेशनात याबाबतचा प्रस्ताव मांडणार नसल्याचे मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले. त्यामुळे लाडक्या बहिणींना वाढीव रकमेसाठी आणखी काही महिने वाट पाहावी लागणार असल्याचे दिसते.

कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगिती 

कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना सत्र न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगिती दिली आहे. त्यामुळे त्यांची आमदारकी शाबूत राहू शकणार आहे.

आझमींना उत्तर प्रदेशात आणा; आम्ही उपचार करू : योगी आदित्यनाथ

समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांना उत्तर प्रदेशमध्ये आणा. आम्ही इकडे त्यांच्यावर उपचार करू, असे म्हणत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आझमी आणि समाजवादी पक्षावर टीका केली. तसेच आझमी यांना मंत्रिमंडळातून का काढत नाहीत? असा सवालही त्यांनी केला.

औरंगजेबाचं उदात्तीकरण भोवलं; अबू आझमींना दणका, विधानसभेतून निलंबित

समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांचे अर्थसंकल्पीय अधिवेशन संपेपर्यंत निलंबन करण्यात आले आहे. औरंगजेबचं उदात्तीकरण करणार विधान केल्याप्रकरणी त्यांच्यावर ही कारवाई केली आहे. संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटील यांनी निलंबनाचा प्रस्ताव मांडला होता. त्यानंतर विधानसभेने सर्वानुमते हा प्रस्ताव मंजूर केला.

Abu Azmi latest controversy : अबू आझमी यांचे निंलबन करा

औरंगजेबचं कौतुक करणारे समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी यांच्यावर टीका होत आहे. त्याचे निलंबन व्हावे, अशी मागणी विधानपरिषदेत करण्यात आली. भाजप नेते आक्रमक झाले आहेत.

Santosh Deshmukh Case: वाहनांच्या रांगा लागल्या

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ जालन्यातील रामनगर साखर कारखाना येथे रास्ता रोको आंदोलन सुरु आहे. रस्ता रोको आंदोलनामुळे जालना -मंठा रोडवर वाहनाच्या रांगा लागल्या आहेत.

Hasan Mushrif live: हसन मुश्रीफ यांनी पालकमंत्रीपद सोडलं

Washim News: राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार हसन मुश्रीफ यांनी वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्रीपद सोडले आहे.

Donald Trump News : ट्रम्प यांचा सर्व परदेशी मदत थांबवण्याचा निर्णय, भारताबबतही निर्णय घेतला

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज (ता.5) संसदेच्या संयुक्त सत्राला संबोधित केल. अमेरिकेच्या अध्यक्षपदी ते दुसऱ्यांदा निवडून आले असून नव्या कार्यकाळात पहिल्यांदाच संसदेला संबोधित केलं. यावेळी त्यांनी विविध घोषणा केल्या असून यात वेगवेगळ्या देशांना दिली जाणारी परदेशी मदत पूर्णपणे थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच ट्रम्प यांनी भारत व चीनवर अतिरिक्त आयात शुल्क लादण्याची देखील घोषणा केलीय. या घोषणेमुळे भारतीय अर्थव्यवस्थेवर परिणाम होऊ शकतो. भारताप्रमाणेच ट्रम्प यांनी कॅनडा व मेक्सिकोच्या अतिरिक्त आयात शुल्क वाढ केली आहे.

Bhaskar Jadhav News : भास्कर जाधवांचा विरोधी पक्षनेता होण्याचा मार्ग कठीणच?

भास्कर जाधवांचा विरोधी पक्षनेता होण्याचा मार्ग कठीण असून त्यांच्या नावाला भाजप आणि शिवसेनेचा विरोध होण्याची शक्यता वर्तवली जातेय. महाविकास आघाडीचं सरकार असताना ते तालिका अध्यक्ष होते. त्यावेळी त्यांनी भाजपच्या आमदारांचं निलंबन केलं होतं. तर शिवसेना फुटीनंतर एकनाथ शिंदेंवर त्यांनी टोकाची टीका केली होती. यामुळे त्यांच्या नावाला दोन्ही प्रमुख सत्ताधारी पक्षांकडून होण्याची शक्यता आहे.

Harshwardhan Sapkal : काँग्रेसचा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी स्वबळाचा नारा?

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी काँग्रेसने तयारीला सुरूवात केली आहे. नव्या प्रदेशांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या या निवडणुकीसाठी नवनवीन रणनीती आखण्यात येत आहेत. त्याचाच भाग म्हणून प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आगामी निवडणुका स्वबळावर लढण्या संदर्भात चाचपणी सुरू केली आहे.

Swargate Rape Case News : दत्तात्रय गाडेच्या निशान्यावर सोलापूर अहिल्यानगरचे बसस्थानकही

स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे याचे कारनामे आता पोलिसांच्या तपासात उघड होत आहेत. पोलिसांनी तपासलेल्या मागील दोन वर्षातील तांत्रिक रेकॉर्डमधून आरोपी दत्तात्रय गाडे पुण्यातील स्वारगेट, शिवाजीनगर, पुणे स्टेशनसह शिरुर, अहिल्यानगर आणि सोलापूर शहरातील बसस्थानकातही वावरत असल्याचे समोर आले आहे. पण सर्वाधिक काळ तो स्वारगेट बसस्थानकातच असल्याचे आता समोर आले आहे.

Dapoli News : दापोली नगराध्यक्षांच्या विरोधात शिंदेच्या शिवसेनेचा अविश्वासाचा ठराव

दापोली नगर पंचायतावर सत्ता स्थापन करण्यासाठी शिंदेची शिवसेना ऍक्शन मोडवर आली असून याआधीच ठाकरे गटाचे 14 नगरसेवक फोडण्यात आले आहेत. या 14 नगरसेवकांनी वेगळा गट तयार करून शिंदे गटात प्रवेश केला होता. यानंतर आता दापोली नगराध्यक्षांच्या विरोधात अविश्वासाचा ठराव रत्नागिरी जिल्हाधिकारी यांच्याकडे दाखव करण्यात आला आहे. मंत्री योगेश कदम यांच्या मार्गदर्शनात दापोली नगरपंचायत ताब्यात घेण्यासाठी हालचालींना वेग आहे.

Belgaum News : महापौर, उपमहापौर निवडणूक 15 मार्चला होण्याची शक्यता?

महापौर-उपमहापौर निवडणुकीचा फेरप्रस्ताव महापालिकेकडून प्रादेशिक आयुक्त कार्यालयाकडे देण्यात आला आहे. प्रादेशिक आयुक्त संजीव शेट्टन्नावर यांनी तो प्रस्ताव मंजूर केला असून महापौर निवडणुकीचा मुहूर्त लागला आहे. तर महापौर निवडणूक 15 मार्चला होण्याची शक्यता आहे.

Belgaum News : प्रेयसीचा खून करून प्रियकराने संपवले जीवन

प्रेम प्रकरणातून प्रियकराने प्रेयसीवर चाकूने हल्ला करून तिचा खून केला आणि स्वतःवरही चाकूने वार करून घेऊन जीवन संपवल्याची खळबळजनक घटना कर्नाटकमधील बेळगावमध्ये उघडकीस आली आहे. ही घटना खासबाग सर्कलजवळील घरात मंगळवारी (ता. 4) सायंकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून मृत युवतीचे नाव ऐश्वर्या लोहार (वय 19, रा. नवी गल्ली, शहापूर) असे आहे. तर प्रशांत कुंडेकर (वय 29, रा. येळ्ळूर) असे मृत प्रियकराचे नाव आहे.

Devendra Fadnavis News : देवेंद्र फडणवीस कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

प्रशांत कोरटकरने दिलेल्या धमकी प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर आंदोलन करण्यावर शिवप्रेमी आणि इंडिया आघाडी ठाम आहे. दरम्यान देवेंद्र फडणवीस उद्या (ता.6) कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. प्रशांत कोरटकरला 11 तारखेपर्यंत अंतरिम जामीन देण्यात आला आहे.

Beed Crime News : बीडमध्ये पाच वर्षांत 276 खून; 766 जणांच्या हत्येचा प्रयत्न

गेल्या 10 महिन्यांत बीडमध्ये 36 खुनाच्या घटना उघडकीस आल्याची धक्कादायक माहिती मंगळवारी (ता.4) विधिमंडळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. तर गेल्या पाच वर्षात याच बीड जिल्ह्यात 276 जणांचे खून करण्यात आले असून 766 जणांच्या हत्येचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक माहितीही फडणवीस यांनी दिली आहे.

Manikrao Kokate News : माणिकराव कोकाटेंचा फैसला आज! मुंडेंच्या राजीनाम्यानंतर दबाव वाढला?

संतोष देशमुख हत्याकांडप्रकरणी अन्न व नागरी पुरवठामंत्री धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावा लागला आहे. मंत्रिपदावर पाणी सोडावे लागल्यानंतर आता त्यांची आमदारकी देखील धोक्यात आली आहे. अशातच आज बनावट कागदपत्रांच्या आधारे सदनिका लाटल्याप्रकरणी कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर राजीनाम्यासाठी दबाव वाढला आहे. त्यांच्या शिक्षेच्या स्थगिती अर्जावर आज (ता.5) जिल्हा सत्र न्यायालयाय निकाल देण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com