Maharashtra Bandh July 2026 Sarkarnama
महाराष्ट्र

Maharashtra Bandh : महाराष्ट्रात आज बंदची हाक! राज्यात काय सुरू अन् काय बंद? जाणून घ्या 'A to Z' माहिती

Maharashtra Bandh A To Z Information : महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर राज्यात काय सुरू आणि काय बंद राहणार? शाळा, महाविद्यालये, वाहतूक, बाजारपेठा आणि सरकारी सेवांची A to Z माहिती जाणून घ्या.

Rashmi Mane

Maharashtra Closed Today: महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात विविध ठिकाणी आंदोलने, निदर्शने आणि राजकीय हालचालींना वेग आला आहे. दिल्लीतील जंतर मंतर येथे सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनावर पोलिसांनी केलेल्या कारवाईच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीने राज्यव्यापी बंदची घोषणा केली आहे. या आंदोलनाला काँग्रेस, डावे पक्ष, काही शैक्षणिक संस्था, कोचिंग क्लासेस तसेच कामगार संघटनांनी पाठिंबा दिल्याचे सांगितले जात आहे.

बंदच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये काय सुरू राहणार आणि काय प्रभावित होणार याबाबत उत्सुकता आहे. अत्यावश्यक सेवा मात्र नेहमीप्रमाणे सुरू राहणार आहेत. रुग्णालये, औषधांची दुकाने, दूध वितरण व्यवस्था आणि इतर जीवनावश्यक सेवा सुरळीत ठेवण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे.

बस सेवा आणि लोकल रेल्वे नियमितपणे चालविण्याचे नियोजन करण्यात आले असले तरी काही भागांमध्ये आंदोलनांमुळे वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. काही ठिकाणी रस्ते रोको किंवा निदर्शने झाल्यास वाहतूक कोंडी निर्माण होऊ शकते. प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत भूमिका स्पष्ट करताना म्हटले, "आम्ही एक नवीन पिढी घडवण्याचा प्रयत्न करत आहोत. माझ्या मते, सरकारला जबाबदार धरले पाहिजे.

सरकारने विद्यार्थी आंदोलनावर अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही, त्यामुळे 23 जुलै रोजी महाराष्ट्रात बंद पाळला जाईल." तसेच त्यांनी राहुल गांधींनी जंतर मंतर येथे जाऊन आंदोलनात सहभागी व्हावे, असे मत व्यक्त केले. "हे विद्यार्थी आंदोलन त्यांचे नसले तरी, ते त्याला पूर्णपणे पाठिंबा देतात," असेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद येथे शिवसेना ठाकरे गट, काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. विद्यार्थी आणि विद्यार्थिनींवरील कथित पोलिस अत्याचाराच्या निषेधार्थ त्यांनी रस्ता रोको आंदोलन सुरू केले आहे. सरकारविरोधी घोषणाबाजीसह केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत असून परिसरात आंदोलनाचे वातावरण तापले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT