MPSC Exam Pattern : 'MPSC'कडून राज्य सेवा मुख्य परीक्षेत मोठा बदल; 'त्या' विषयाचे दोन्ही पेपर वगळले, गुणही बदलले...

MPSC State Services Exam : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या निर्णयानुसार, राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२७ पासून एकूण सात अनिवार्य पेपर असतील. यामध्ये मराठी आणि इंग्रजी या भाषा विषयांचे प्रत्येकी एक अर्हताकारी पेपर, निबंधाचा एक पेपर आणि सामान्य अध्ययनाचे चार पेपर यांचा समावेश असेल.
MPSC 2027 Exam Pattern | State Services Main Exam Changes
MPSC 2027 Exam Pattern | State Services Main Exam ChangesSarkarnama
Published on
Updated on

MPSC News, 23 Jul : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२७ पासून परीक्षा पद्धतीत मोठे बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. नव्या पद्धतीनुसार, मुख्य परीक्षेतील वैकल्पिक विषयाचे दोन्ही पेपर रद्द करण्यात आले असून, मुलाखतीचे गुण १७५ निश्चित करण्यात आले आहेत. याबाबत आयोगाने २५ जून २०२६ रोजी प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे.

आयोगाच्या निर्णयानुसार, राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२७ पासून एकूण सात अनिवार्य पेपर असतील. यामध्ये मराठी आणि इंग्रजी या भाषा विषयांचे प्रत्येकी एक अर्हताकारी पेपर, निबंधाचा एक पेपर आणि सामान्य अध्ययनाचे चार पेपर यांचा समावेश असेल.

मराठी व इंग्रजी या दोन्ही भाषा विषयांच्या पेपरमध्ये किमान २५ टक्के गुण मिळवणे आवश्यक असेल. मात्र हे दोन्ही पेपर केवळ अर्हताकारी स्वरूपाचे असल्याने त्यांचे गुण अंतिम गुणवत्ता यादीत ग्राह्य धरले जाणार नाहीत. मुख्य परीक्षेच्या अंतिम निकालासाठी निबंधाचा एक पेपर आणि सामान्य अध्ययनाचे चार पेपर, अशा एकूण पाच पेपरांचे १२५० गुण विचारात घेतले जाणार आहेत.

MPSC 2027 Exam Pattern | State Services Main Exam Changes
Pune ZP : पुणे जिल्हा परिषदेचा मोठा निर्णय! भू-माफियांसह अनधिकृत कब्जा करणाऱ्यांची कुंडली एका क्लिकवर समोर येणार

यापूर्वी मुख्य परीक्षेत असलेले वैकल्पिक विषयाचे दोन्ही पेपर पूर्णपणे वगळण्यात आल्याने लेखी परीक्षेचे एकूण गुणही १२५० इतके निश्चित करण्यात आले आहेत. दरम्यान, लेखी परीक्षा आणि मुलाखतीच्या गुणांचे प्रमाण सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार संतुलित ठेवण्यासाठी आयोगाने मुलाखतीचे गुण १७५ निश्चित करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२७ आणि त्यानंतर होणाऱ्या सर्व राज्यसेवा मुख्य परीक्षांना लागू राहणार आहे.

MPSC 2027 Exam Pattern | State Services Main Exam Changes
CJP on JP Nadda : "धर्मेंद्र प्रधानांना राजीनामा द्यावाच लागेल; जेपी नड्डांना लाज वाटली पाहिजे...", CJP प्रवक्ता पहिल्यांदाच थेट मोदींच्या मंत्र्याला भिडला

आयोगाने स्पष्ट केले आहे की, राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२७ ची सुधारित परीक्षा योजना आणि सविस्तर स्वरूप लवकरच आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर स्वतंत्रपणे प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यामुळे २०२७ पासून राज्यसेवा परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांना आता नव्या परीक्षा पद्धतीनुसार तयारी करावी लागणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com