Devendra Fadnavis-Ravindra Chavan Ready For Upcoming Local Body Election News Sarkarnama
महाराष्ट्र

BJP News : पराभूत सुजय विखे पाटील, राम सातपुतेंकडे नवी जबाबदारी; मंत्रिपद नाकारलेल्या 6 नेत्यांचेही भाजपच्या कार्यकारिणीत पुनर्वसन

BJP News : भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पदभार स्वीकारल्यानंतर ८ महिन्यांनी ४३ जणांची जम्बो कार्यकारिणी जाहीर केली आहे. यात १२ उपाध्यक्ष व ६ सरचिटणीसांसह निष्ठावंत आणि नाराज नेत्यांना स्थान देऊन समतोल साधण्याचा प्रयत्न केला आहे.

Hrishikesh Nalagune

BJP News : भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पदभार स्वीकारल्याच्या 8 महिन्यांनंतर त्यांची नवी कार्यकारिणी जाहीर केली आहे. 12 उपाध्यक्ष, 6 सरचिटणीस, 12 चिटणीस आणि संघटनेतील विविध विभागांचे अध्यक्ष अशी जवळपास 43 जणांची ही जम्बो कार्यकारिणी आहे. कार्यकारिणीतील नावे वाचल्यास भाजपने यातून नाराज नेत्यांची समजूत काढल्याची चर्चा आहे. निवडणुकीत पराभूत झालेले, मंत्रिपद नाकारलेले, आयात आणि निष्ठावंत अशा नेत्यांचा या यादीत समावेश आहे.

पराभूत नेत्याचे पुनर्वसन :

भाजपच्या नव्या कार्यकारिणीमध्ये पराभूत नेत्यांचे पुनर्वसन करण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून येते. लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेले सुजय विखे पाटील, रामदास तडस, भारती पवार यांची उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली आहे. विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या अर्चना चाकुरकर यांच्याकडेही उपाध्यक्षपद देण्यात आले आहे. राम सातपुते यांच्याकडे चिटणीस पदाची जबाबदारी दिली आहे.

मंत्रिपद नाकारलेल्या आमदारांकडे नवी जबाबदारी :

फडणवीस सरकारमध्ये आशा असलेल्या काही नेत्यांना मंत्रिपद मिळालेले नाही. या नेत्यांना पक्षाच्या कार्यकारिणीत स्थान दिले आहे. यात निरंजन डावखरे, योगेश सागर, संजय कुटे यांच्याकडे सरचिटणीस पदाची जबाबादारी दिली आहे. तर प्रशांत ठाकूर, मंगेश चव्हाण आणि परिणय फुके या आमदारांची चिटणीस म्हणून नियुक्ती झाली आहे. मिहिर कोटेचा हे कोषाध्यक्ष असणार आहेत.

आयात - निष्ठावंतांमध्ये बॅलेन्सचा प्रयत्न :

भाजपच्या कार्यकारिणीत आयात आणि निष्ठावंत नेत्यांमध्ये समतोल साधण्याचा प्रयत्न झाल्याचे दिसून येते. केशव उपाध्ये, प्रवीण पोटे, संजय कुटे, माधवी नाईक, राजेश पांडे, सुनील राणे, मंगेश चव्हाण, परिणय फुके, योगेश टिळेकर अशा पक्षासाठी वर्षानुवर्षे काम करणाऱ्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. त्याचबरोबर सुजय विखे पाटील, गोपीचंद पडळकर, अर्चना चाकुरकर, कृष्णराज महाडिक, चित्रा वाघ अशा भाजपमध्ये बाहेरून आलेल्या नेत्यांचीही नावे दिसून येतात.

दोनवेळा प्रस्ताव परत पाठवला होता :

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसह नावांवरील एकमत आणि इतर कारणामुळे नियुक्त्या रखडल्या होत्या. नव्या कार्यकारिणीचा दोनदा पाठवलेला प्रस्तावावर दिल्लीतून दुरुस्त्यांसाठी परत पाठवण्यात आला होता. आता मात्र भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने नव्या प्रदेश कार्यकारिणीला मंजुरी दिली आहे. 2029 मधील लोकसभा आणि विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून, नव्या कार्यकारिणीत नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT