SSC HSC Board Sarkarnama
महाराष्ट्र

SSC HSC Board : दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! बोर्डाने घेतला मार्कशीट आणि सर्टिफिकेटबाबत महत्वाचा निर्णय

maharashtra board anti fraud system : महाराष्ट्रातील दहावी आणि बारावीच्या लाखो विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी हाती आली असून आता विद्यार्थ्यांना मार्कशीट आणि सर्टिफिकेट एकाच दिवशी मिळणार आहे.

Aslam Shanedivan

  1. महाराष्ट्र बोर्डाने दहावी आणि बारावी विद्यार्थ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे.

  2. मार्कशीट आणि सर्टिफिकेट आता एकाच वेळी दिले जाणार आहेत.

  3. QR कोड आणि फोटोमुळे कागदपत्रांची पडताळणी सोपी होऊन फसवणूक टळणार आहे.

Mumbai News : राज्यातील राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून लाखो दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाप्रमाणे मार्कशीट आणि सर्टिफिकेटसाठी विद्यार्थ्यांना प्रतीक्षा करावी लागणार नसून मार्कशीट आणि सर्टिफेकेट एकाच वेळी मिळणार आहे. तसेच बोर्डाने मार्कशीट आणि सर्टिफिकेटबाबत ही मोठा निर्णय घेतला असून आता दोन्ही मार्कशीट आणि सर्टिफिकेटवर विद्यार्थ्याचा फोटो आणि एक क्युआर कोड असणार आहे. यामुळे विद्यार्थ्याची माहिती सहज मिळणार असून बोगस मार्कशीट त्वरित ओळखता येणार आहे.

नुकताच दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा झाल्या असून आता निकालाची प्रतिक्षा लाखो विद्यार्थ्यांना लागली आहे. एकीकडे निकाल लागला तरी दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना मार्कशीट आणि सर्टिफिकेटसाठी प्रतीक्षा करावी लागते. निकाल जाहीर झाल्यानंतर काही दिवसांनी विद्यार्थ्यांना निकालाची प्रत दिली जायची. त्यानंतर सुमारने सहा महिन्यानंतर विद्यार्थ्यांना सर्टिफिकेट दिले जायचे. पण आता महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थ्यांची ही प्रतीक्षा संपणार असून याबाबत महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने मोठा निर्णय घेतला आहे.

बोर्डाकडून दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना मार्कशीट आणि सर्टिफेकेट एकाच वेळी देण्यात येणार आहे. त्याचबरोबर यावेळी दोन्ही मार्कशीट आणि सर्टिफिकेटमध्ये मोठे बदल करण्याचाही निर्णय बोर्डाने घेतला आहे. दोन्ही मार्कशीट आणि सर्टिफिकेटवर आता विद्यार्थ्याचा फोटो आणि एक क्युआर कोड असणार आहे. हा निर्णय बोगस मार्कशीट आणि सर्टिफिकेट त्वरित ओळखता यावा यासह क्यूआर कोड स्कॅन केल्यानंतर विद्यार्थ्याची माहिती सहज मिळावी यासाठी घेण्यात आला आहे.

दरम्यान राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून लवकरच दहावी आणि बारावीचा निकाल घोषित करण्याच्या तयारीत आहे. मागील वर्षी मे महिन्याच्या पहिल्या किंवा दुसर्‍या आठवड्यात दहावी आणि बारावीचा निकाल जाहीर केला होता. यंदा मात्र तो लवकर जाहीर करण्याची तयारी बोर्ड करत आहे. याप्रमाणे दहावीचा निकाल लवकर जाहीर होण्याची शक्यता आहे.

तर बोगस मार्कशीट शोधण्यासह निकालाची सत्यता पडताळण्यासाठी बोर्डाने क्यूआर कोडचा वापर केला आहे. यामुळे आता काही सेकंदात निकालाची सत्यता पडताळता येणार आहे. नव्या मार्कशीटवर आधारकार्डानुसार विद्यार्थ्याचे नाव, फोटो आणि क्यूआर कोड असणार आहे.

FAQs :

1. नवीन नियम काय आहे?
मार्कशीट आणि सर्टिफिकेट एकाच वेळी विद्यार्थ्यांना दिले जाणार आहेत.

2. QR कोडचा फायदा काय आहे?
QR कोड स्कॅन करून विद्यार्थ्याची माहिती लगेच मिळते.

3. विद्यार्थ्यांना प्रतीक्षा करावी लागेल का?
नाही, आता प्रतीक्षा करावी लागणार नाही.

4. हा निर्णय कोणासाठी आहे?
दहावी आणि बारावीच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी आहे.

5. फसवणूक कशी रोखली जाईल?
QR कोडमुळे बनावट मार्कशीट लगेच ओळखता येतील.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT