SSC Paper Leak Inside Story: 10वी पेपर चोरी प्रकरण: सीसीटीव्हीने उघडले गुपित! 'स्ट्राँग रूम'चं कुलूप तोडलं अन् ; पेपर चोरीची 'A to Z' इनसाईड स्टोरी

Strong room break-in exam papers CCTV reveals paper theft: 10वीच्या पेपर चोरी प्रकरणात सीसीटीव्हीमुळे मोठा खुलासा! स्ट्राँग रूमचे कुलूप तोडून 50 गठ्ठे गायब. वाचा संपूर्ण इनसाईड स्टोरी.
SSC 10th exam paper theft inside story
SSC 10th exam paper theft inside storySarkarnama
Published on
Updated on

SSC board exam security breach news: सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यात दहावीच्या परीक्षेच्या पार्श्वभूमीवर एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सांगोला विद्यामंदिर प्रशालेत बोर्ड कस्टडीमध्ये ताब्यात ठेवण्यात आलेल्या भूगोल विषयाच्या प्रश्नपत्रिका सोमवारी रात्री चोरीला गेल्याचं उघड झालं. तब्बल 50 गठ्ठे गायब झाल्याने शिक्षण व्यवस्थेत मोठी खळबळ उडाली आहे.

ही सर्व प्रश्नपत्रिका शाळेतील ‘स्ट्राँग रूम’मध्ये अत्यंत सुरक्षितपणे ठेवण्यात आल्या होत्या. मात्र रात्रीच्या वेळी अज्ञात व्यक्तीने कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि पेपरची पेटी उघडून प्रश्नपत्रिका चोरून नेल्या. विशेष म्हणजे, आतल्या कॅमेऱ्यांची नोंद उपलब्ध नसली तरी बाहेरील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे एका तरुणाचा सहभाग समोर आला आहे.

SSC 10th exam paper theft inside story
Ambadas Danve On BJP : खोक्यांच्या 'साव'लीत घेण्याचा 'अतुलनीय' प्रयत्न; अंबादास दानवेंचा भाजपाच्या अतुल सावे यांच्यावर निशाणा!

मंगळवारी सकाळी हा प्रकार लक्षात येताच केंद्रावरील कर्मचाऱ्यांमध्ये एकच गोंधळ उडाला. लगेचच याची माहिती शिक्षण मंडळ आणि पोलिसांना देण्यात आली. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने या घटनेची गांभीर्याने दखल घेतली. विभागीय अध्यक्ष औदुंबर उकिरडे यांनी सांगोल्यात भेट देऊन तपास सुरू केला. दुसरीकडे, सोलापूर पोलिसांनीही तपासाची सूत्रे हाती घेतली आहेत. या संपूर्ण प्रकरणाची कसून चौकशी होणार आहे.

SSC 10th exam paper theft inside story
Shiv Sena withdrawal Sangli ZP news : सांगली जिल्हा परिषदेत शिवसेनेची तासाभरातच माघार : अध्यक्षपदासाठी पाटील विरुद्ध मासाळ तर उपाध्यक्षपदासाठी लाड-जाधव भिडणार!

या प्रकरणामागे शाळेतील अंतर्गत वाद असल्याचा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे. मुख्याध्यापक पदासाठी सुरू असलेली स्पर्धा आणि काही शिक्षकांमधील मतभेद यामुळेच हा कट रचला गेला असावा, अशी चर्चा सुरू आहे. सुमारे 35 वर्षांच्या मुख्याध्यापकांविरोधात काहींच्या मनात असलेल्या इर्ष्येमुळे हा प्रकार घडल्याची शक्यता तपासात समोर येत आहे.

दरम्यान, शिक्षण विभागाने तातडीने कारवाई करत प्रभारी शिक्षणाधिकारी सुयोग नवले आणि मुख्याध्यापक अमोल गायकवाड यांना निलंबित केलं आहे. तसेच परीक्षा केंद्रावर तैनात असलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांवरही हलगर्जीपणाचा ठपका ठेवण्यात आला आहे.

या घटनेमुळे बोर्डाच्या सुरक्षाव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. मात्र, नियोजित भूगोलाचा पेपर कोणताही अडथळा न येता पार पडल्याची माहिती मंडळाने दिली आहे. आता या चोरीमागचा खरा सूत्रधार कोण, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com