Ajit Pawar Ladki Bahin Yojana Sarkarnama
महाराष्ट्र

Ajit Pawar Budget 2025 Live : सत्ता मिळवून देणाऱ्या लाडक्या बहिणींचा भ्रमनिरास; अजितदादांकडून 'ती' घोषणा नाहीच...

Maharashtra Financial Policies 2025 Ajit Pawar Budget Speech Highlights Women Welfare Scheme Maharashtra : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत सध्या महिलांना दरमहा दीड हजार रुपये मिळत आहेत.

Rajanand More

Budget 2025 : अर्थमंत्री अजित पवारांनी सोमवारी राज्याचा 2025-26 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये त्यांनी अनेक मोठ्या घोषणा केल्या असल्या तरी लाडक्या बहिणींचा मात्र भ्रमनिरास झाला आहे. विधानसभा निवडणुकीदरम्यान महायुतीने सत्ता आल्यास मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा हप्ता 2100 रुपये करण्याचे आश्वासन दिले होते. पण सत्ता आल्यानंतर सलग दुसऱ्या अधिवेशनातही त्याची घोषणा झालेली नाही.

लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातील सुमारे अडीच कोटी महिलांना दरमहा दीड हजार रुपये दिले जात आहे. विधानसभा निवडणुकीआधी जुलै महिन्यापासून पैसे देण्यास सुरूवात झाली. त्यानंतर निवडणुकीच्या प्रचारादरम्यान महायुतीने 2100 रुपये देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. पण अजित पवारांकडून अर्थसंकल्पात त्याची घोषणा करण्यात आली नाही. त्यामुळे आता विरोधक आक्रमक झाले आहेत.

काय म्हणाले अजित पवार?

लाडकी बहीण योजनेवर बोलताना अजितदादा म्हणाले, ‘योजनेंतर्गत सुमारे 2 कोटी 53 लाख महिलांना जुलै 2024 पासून लाभ दिला जात असून त्यासाठी आतापर्यंत 33 हजार 232 कोटी रुपये खर्च झाला आहे. 2025-26 मध्ये योजनेसाठी 36 हजार कोटी रुपये नियतव्यय प्रस्तावित आहे.’ अर्थसंकल्पात करण्यात आलेली ही तरुतुद दरमहा 1500 रुपये यासाठीच असल्याचे स्पष्ट झाले आहे.

त्यामुळे अर्थसंकल्प सादर करताना विरोधी बाकांवरील काही सदस्यांनी 2100 रुपयांचा मुद्दा उपस्थित केला. त्यावर अजितदादांनी अर्थसंकल्प होऊ द्या, एवढेच उत्तर दिले. मात्र, या योजनेतून मिळणाऱ्या अनुदानाचा उपयोग काही महिला गटांनी आर्थिक उपक्रमासाठी बीज भांडवल म्हणून केला असून अशा गटांना आणखी प्रोत्साहन देण्यासाठी विशेष योजना संकेत त्यांनी यावेळी दिले.

दरम्यान, विरोधकांकडून या अर्थसंकल्पावर टीका केली जात आहे. त्यांच्याकडून महायुतीचा जाहीरनामाच दाखवला जात आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना 2100 रुपयांची घोषणा करण्यात आली होती. त्यामुळे आता या मुद्द्यावर विरोधक आणि सत्ताधारी आमनेसामने येण्याची शक्यता आहे. मंगळवारपासून अधिवेशनात अर्थसंकल्पावर चर्चा सुरू होईल. त्यामध्ये हा मुद्दा गाजू शकतो.

(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT