Maharashtra budget session press conference : राज्यसभा निवडणुकीला समोरे जाताना, महाविकास आघाडीत एकी दिसत नाही. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाकडून निवडणुकीबाबत आक्रमक भूमिका घेण्यात आली आहे. तशी काँग्रेसबरोबर चर्चा देखील सुरू झाल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाला काहीस दूर ठेवण्यात आलं आहे.
विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी महाविकास आघाडीच्या बैठकीला शरद पवार राष्ट्रवादीच्या नेते गैरहजर दिसले. सत्ताधाऱ्यांच्या चहापानावर बहिष्कार घालताना विरोधकांच्या कम्युनिकेशन गॅपवर शिवसेना (Shivsena) नेता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खुमासदार टोलेबाजी केली.
विधिमंडळाच्या अधिवेशनापूर्वी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यानंतर पहिल्यादांच, असं अधिवेशन होत असल्यानं पत्रकार परिषदेतील वातावरण काहीसं धीर-गंभीर होतं. असे असले, तरी विरोधकांच्या कम्युनिकेशन गॅपवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार टोलेबाजी केली.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) म्हणाले, "आम्ही जे बोलतो ते करून दाखवतो. निवडणूक काळात ज्या घोषणा केल्या आहेत, त्या योग्य वेळी पूर्ण होतील. प्रथेप्रमाणे विरोधकांनी चहापानावर बहिष्कार घातला आहे. हे सत्ताधाऱ्यांचे अधिवेशन नाही. सत्ताधारी आणि विरोधक हे एका रथाचे दोन चाकं आहेत. परंतु हम नही सुधरेंगे, यापद्धतीने विरोधकांचे काम सुरू आहे." कम्युनिकेशन गॅप त्यांच्यात दिसतो आहे. चहापानावर बहिष्कार घातला, पण त्यांच्याच बैठकीवर त्यांच्या सहकाऱ्यांनी बहिष्कार घातला, याकडे उपमुख्यमंत्री शिंदेंनी लक्ष वेधलं.
विरोधकांमधील कम्युनिकेशन गॅपवर टोलेबाजी करताना, हा राज्यसभेचा इम्पॅक्ट असेल, 'एक अनार सौ बीमार', अशी त्यांची गत झालेली दिसते आहे, असा टोला एकनाथ शिंदे यांनी लगावला. एक म्हणतो, 'आम्ही देणार', दुसरा म्हणतो 'आम्ही देणार नाही', तिसरा म्हणतो, आम्ही काय करणार? असं खुप काही पुढं पाहायला मिळेल, असा टोला उपमुख्यमंत्री शिंदे यांनी लगावला.
काळी चहा-काॅफी पिण्यापेक्षा, सत्ताधाऱ्यांचे काळे धंदे बाहेर काढू, असे काही लोकं म्हणाले. त्याल प्रत्युत्तर देताना, 'मी एवढंच सांगतो, जे काही पूर्वीचे सरकार होतं. त्यांनी काय काम केलं हे महाराष्ट्राच्या जनतेसमोर आहे. म्हणजे, राज्याच्या जनतेनं विकासाला स्वीकारलं आहे. विकासाला यांनी नाकारलं आहे. त्यामुळे काळे धंदे कोणाचे होते, हे आज काही मी बोलत नाही. परंतु योग्य वेळी बोलेल. विरोधकांनी सभागृहात बोलले, तर त्याची त्यांनी नक्कीच उत्तर देऊ,' असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.