राज्य मंत्रिमंडळाने जलसंधारण आणि वृद्ध विभागातील 8,776 रिक्त पदांना मंजुरी दिली आहे.
सप्टेंबर 2025 मध्ये घोषित करण्यात आलेल्या भरती प्रक्रियेला अखेर अधिकृत मान्यता मिळाली.
या निर्णयामुळे विभागातील नोकरभरतीचा मार्ग मोकळा झाला असून बेरोजगार युवकांना दिलासा मिळणार आहे.
Cabinet Decision News : अनेक वर्ष रखडलेल्या मृदा आणि जलसंधारण विभागातील रिक्त पदांना मंत्रिमंडळाने मान्यता दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आजच्या (गुरूवार ता.१४) मंत्रिमंडळाच्या बैठकीत याचा निर्णय घेण्यात आला. सप्टेंबर 2025 साली राज्य सरकारकडून या भरतीची घोषणा करण्यात आली होती. अखेर आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्यावर शिक्कामोर्तब करण्यात आला. मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत राज्यातील तब्बल 8,776 पदांना मान्यता देण्यात आली. मंत्रिमंडळाच्या या निर्णयामुळे विभागातील नोकर भरतीचा मार्ग सुकर झाला आहे.
मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. त्यामधील मृदा व जलसंधारण विभागाचा सुधारित आकृतीबंध निश्चित करण्यात आला. राज्यातील सुमारे ८ हजार ७६७ पदांना मान्यता दिली. त्यातील मृद व जलसंधारण विभागाकरिता ६ हजार ४८१ व महाराष्ट्र जलसंधारण महामंडळाकरिता दोन पदांसह ६ हजार ४८३ पदांव्यतिरिक्त सुमारे २ हजार २८४ वाढीव पदांना मान्यता देण्यात आली आहे. तर विभागाच्या क्षेत्रीय यंत्रणेची फेररचना होणार आहे.
राज्य सरकारकडून 2017 मध्ये वृद्ध व जलसंधारण विभागाची स्थापना केली होती त्यावेळी 16,423 पदांचा एक आकृतीबंध तयार करण्यात आला होता. मात्र काही कारणास्तव ही पदे विभागाला मिळू शकली नाहीत. त्यामुळे पुन्हा एकदा उच्चस्तरीय समितीकडे आकृतीबंध तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.
त्यामध्ये काही अनावश्यक पदे वगळण्यात आली होती. त्याला उच्चस्तरीय समितीने मान्यता दिली होती. त्यामुळे ही पदे लवकर भरली जातील अशी अपेक्षा होती. अखेर आज मंत्रिमंडळाने या आकृतीबंद व पदांना मान्यता दिली. त्यामुळे या विभागाची कार्यक्षमता वाढणार आहे.
इतर मागास बहुजन कल्याणमधील विजाभज प्रवर्गाच्या खाजगी अनुदानित निवासी उच्च माध्यमिक आश्रमशाळांतील उच्च माध्यमिक शिक्षकांना, १२ व २४ वर्षाच्या नियमित सेवेनंतर, चट्टोपाध्याय आयोगानुसार वरिष्ठ वेतनश्रेणी व निवडश्रेणी लागू करण्यास मान्यता देण्यात आली.
महाराष्ट्र राज्य अनुसूचित जमाती आयोग अधिनियमामध्ये दोन महत्वाचे बदल करण्यात आले आहेत. आयोगासाठी उपाध्यक्ष पदाची नव्याने निर्मिती हे पद आदिवासी विकास विभागासाठी असणार आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागासाठी अध्यक्षपदाची निर्मिती करण्यात आली आहे.
जलसंधारण आणि वृद्ध विभागातील 8,776 रिक्त पदांना मंजुरी देण्यात आली आहे.
सप्टेंबर 2025 मध्ये राज्य सरकारने या भरतीची घोषणा केली होती.
सरकारी नोकरभरतीचा मार्ग मोकळा होऊन अनेकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.
जलसंधारण विभाग आणि वृद्ध विभागात भरती होणार आहे.
आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या निर्णयाला मंजुरी देण्यात आली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.