

Maharashtra cabinet decisions: राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत पाच महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. राज्याच्या विकासाला नवे तंत्रज्ञान आणि आर्थिक बळ देणारे हे महत्त्वाचे निर्णय असल्याचे मानले जाते. राज्यात आता 'इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता(AI)' हा स्वतंत्र मंत्रालयीन विभाग स्थापन होणार आहे.
आता राज्यात डिजिटल गव्हर्नन्स, AI आणि IT क्षेत्राला मोठी चालना मिळणार असल्याचे या निर्णयावरुन दिसते. माहिती तंत्रज्ञान संचालनालयाचे रूपांतर आयुक्तालयात होणार आहे. त्यासाठी राज्यभरासाठी स्वतंत्र IT कॅडर तयार केला जाणार असल्याची निर्णय कँबिनेट बैठकीत घेण्यात आला.
महावितरणची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. प्रशासनात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्यासाठी दोन महत्त्वाच्या कंपन्या स्थापन केल्या जाणार आहेत.महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी महावितरणची आर्थिक पुनर्रचना होणार.
शासन हमी असलेल्या कर्जा (३२,६७९ कोटी) साठी भांडवली बाजरात सरकारी रोखे येणार. याशिवाय कृषी वितरण व्यवसायाचे विभाजन (Agri Demerger) करण्यात येणार. तसेच महावितरण कंपनी भांडवली बाजारात सूचीबद्ध होणार.
महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग अॅप्लिकेशन सेंटरचे (MRSAC) आता कंपनीत रुपांतर होणार आहे. या निर्णयामुळे रस्ते माहिती प्रणाली, नगररचना, जलयुक्त शिवार – पाणलोट विकास, डोंगरी विकास योजना, ई- पंचनामा, महा अग्री टेक, कांदळवन अभ्यास, भूजल व्यवस्थापन, खनिच व खाणींचा अभ्यासाला गती मिळणार आहे.
महाराष्ट्र प्रतिसादक्षम विकास कार्यक्रम (MRDP) राबविण्यास मंजुरी देण्यात आली आहे. खाजगी भांडवलाच्या मदतीने वित्तपुरवठा उभारण्यात येणार आहे. यासाठी जागतिक बँकेकडून १६५ कोटींचा निधी मिळणार आहे.पुराच्या पाण्याचा निचऱ्यासाठी कोल्हापूर, सांगली, इचलकरंजी शहरांसह, कृष्णा खोऱ्यातील पूराचा धोका कमी करण्यासाठी प्रतिबंधक आराखडे तयार करण्यात येणार.
प्रशासनात गतिमानता आणण्यासाठी भू-स्थानिक तंत्रज्ञानाचा (Geospatial Technology) वापर करण्यासाठी महाराष्ट्र जिओटेक्नॉलॉजी अॅप्लिकेशन सेंटर (महाजिओटेक) कंपनी स्थापन करण्यात येणार आहे. आधुनिक तंत्रज्ञान, संशोधनामुळे विद्यार्थी, व्यावसायिक, संशोधकांसाठी शैक्षणिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.