BJP Minister List  sarkarnama
महाराष्ट्र

BJP Minister List : पंकजा मुंडे, नितेश राणे, गिरीश महाजन यांना मंत्रिपद, भाजपकडून कोणा कोणाला फोन? वाचा संपूर्ण यादी

Maharashtra Cabinet Expansion Oath taking ceremony Pankaja Munde Nitesh Rane Girish Mahajan : भाजप आमदार पंकज भोयर यांना देखील मंत्रि‍पदी संधी मिळणार आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी फोन केल्याची माहिती आहे.

Roshan More

BJP Minister List News: भाजपकडून मंत्रि‍पदाची कुणा कोणाला संधी मिळणार अशी उत्सुकता होती. आज (रविवारी) सकाळपासून भाजप कार्यालयातून मंत्रि‍पदाची शपथ घेण्यासाठी आमदारांना फोन जात आहेत. विधान परिषदेच्या आमदार पंकजा मुंडे यांचे देखील नाव मंत्रि‍पदाच्या यादीत असून त्यांचे समर्थक शपथविधीसाठी नागपूरला रवाना झाले आहेत.

पंकजा मुंडेंसह माधुरी मिसाळ, चंद्रकांत पाटील यांना मंत्रि‍पदासाठी फोन आला आहे. माधुरी मिसाळ यांना पहिल्यांदाच मंत्रि‍पदी संधी मिळणार आहे. तर, सातारा विधानसभेचे आमदार शिवेंद्रराजे भोसले, कणकवली विधानसभेचे आमदार नितेश राणे यांना देखील शपथविधीसाठी फोन आला आहे.

सलग तिसऱ्यांदा विजय मिळवणारे भाजप आमदार पंकज भोयर यांना देखील मंत्रि‍पदी संधी मिळणार आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी फोन केल्याची माहिती आहे. आमदार भोयर यांना राज्यमंत्रिपदी संधी मिळण्याची शक्यता आहे.

मंगलप्रभात लोढा यांना संधी

एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात मंत्री असलेले भाजपचे मंगलप्रभात लोढा यांना पुन्हा मंत्रि‍पदाची संधी मिळाली आहे. लोढा यांच्यासह गिरीश महाजन, जयकुमार रावल, राधाकृष्ण विखे पाटील यांना संधी मिळणार आहे. यासर्वांना शपथविधीसाठी फोन आल्याची माहिती आहे.

गणेश नाईक यांना फोन

राष्ट्रवादी काँग्रेसची साथ सोडून भाजपमध्ये 2019 मध्ये गणेश नाईक यांनी प्रवेश केला होता. नवी मुंबई महापालिका भाजपची सत्ता आणण्यात त्यांचा मोठा वाटा होता. मात्र, त्यांना 2019 मध्ये मंत्रि‍पदी संधी मिळाली नव्हती. त्यामुळे नाईक नाराज असल्याची चर्चा होती. ते शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणार असल्याच्या देखील चर्चा होत्या. मात्र, भाजपमध्ये कायम राहिले. नाईक यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात मंत्रि‍पदाची संधी मिळणार आहे. शपथविधीसाठी त्यांना देखील फोन आल्याची माहिती आहे.

मंत्रि‍पदासाठी फोन आलेले आमदार

नितेश राणे

शिवेंद्रराजे भोसले

चंद्रकांत पाटील

पंकज भोयर

मंगलप्रभात लोढा

गिरीश महाजन

जयकुमार रावल

पंकजा मुंडे

राधाकृष्ण विखे पाटील

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT